Advertisement

दुसऱ्या टेस्टमध्ये पृथ्वीची हाफ सेंच्युरी!


दुसऱ्या टेस्टमध्ये पृथ्वीची हाफ सेंच्युरी!
SHARES

भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान हैद्राबाद इथं सुरू असलेल्या दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये ओपनिंग बॅट्समन पृथ्वी शाॅने हाफ सेंच्युरी मारली. सलग दुसऱ्या मॅचमध्ये पृथ्वीने बाॅलर्सवर हुकूमत गाजवत आपल्या दमदार बॅटींगची झलक दाखवली.


तडाखेबंद बॅटींग

पृथ्वीने तडाखेबंद बॅटींग करताना अवघ्या ३९ बाॅल्समध्ये हाफ सेंच्युरी ठोकली. पृथ्वीच्या बॅटींगचा प्रेक्षकांनी चांगलाच आनंद लुटला. अखेर जोमेल वाॅरिकनच्या बाॅलिंगवर हेटमायरच्या हाती कॅच सोपवून पृथ्वी पॅव्हेलियनमध्ये परतला. पृथ्वीने एकून ७० रन्स केले. यामध्ये ८ बाऊंड्री आणि १ सिक्सरचा समावेश आहे.


भारताचा ८ वा बॅट्समन

पृथ्वी पहिल्या २ इनिंगमध्ये ५० हून अधिक रन्स बनवणारा भारताचा ८ वा बॅट्समन ठरला. याआधी ही कामगिरी दिलावर हुसेन, कृपाल सिंह, सुनील गावस्कर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, सुरेश रैना आणि रोहीत शर्मा यांनी केली आहे.



हेही वाचा-

वेस्ट इंडिज सीरिज: चौथी 'वन डे' वानखेडेऐवजी ब्रेबाॅर्नवर!

'वन डे'त विराटचं कमबॅक, पंतलाही चान्स!



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा