Advertisement

मुख्य प्रशिक्षकपदासाठी ६ उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब

भारतीय क्रिकेट संघाचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह ५ उमेदवार भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत आहेत.

मुख्य प्रशिक्षकपदासाठी ६ उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब
SHARES

भारतीय क्रिकेट संघाचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह ५ उमेदवार भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत आहेत. यामध्ये भारताच्या लालचंद राजपूत, रॉबिन सिंह, न्यूझीलंडचे माइक हेसन, वेस्ट इंडिजचे फिल सिमन्स आणि आॅस्ट्रेलियाच्या टॉम मुडी यांचा समावेश आहे. दरम्यान, शास्त्री हे सध्याच्या भारतीय संघाचे प्रशिक्षक असल्यामुळं त्यांना निवडप्रक्रियेसाठी थेट प्रवेश मिळणार आहे. त्यामुळं उर्वरित ५ जणांमध्ये लढत पाहायला मिळणार आहे.

मुख्य प्रशिक्षकाची निवड

कपिल देव यांच्या अध्यक्षतेखालील क्रिकेट सल्लागार समिती या आठवड्याच्या अखेरीस किंवा पुढील आठवड्यापर्यंत भारताच्या मुख्य प्रशिक्षकाची निवड करण्याची शक्यता आहे. या सर्व उमेदवारांनी कपिल देव यांच्या नेतृत्वातील क्रिकेट सल्लागार समितीसमोर आपलं सादरीकरण केलं. कपिल यांच्या समितीत माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड आणि माजी महिला क्रिकेटपटू शांता रंगास्वामी यांचा समावेश आहे.

नवा प्रशिक्षक कोण?

रवी शास्त्री यांचा कार्यकाळ वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर संपणार असून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात सुरू होणाऱ्या मालिकेद्वारे नवा प्रशिक्षक सूत्रे हाती घेणार आहे. त्यामुळं रवी शास्त्री यांच्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक कोण होणार याकडं जगभरातील सर्व क्रिकेंटप्रेमींची लक्ष लागलं आहे.हेही वाचा -

३० वर्षानंतर पोलिस कोठडीतील हत्येचा उलगडा, सीसीटिव्हीसमोर निवृत्त अधिकारी बरळला

मदतीसाठी धावलेल्या 'त्या' रिक्षाचालकाला आदित्या ठाकरेंनी दिला १ लाखाचा चेकRead this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा