Advertisement

मदतीसाठी धावलेल्या 'त्या' रिक्षाचालकाला आदित्या ठाकरेंनी दिला १ लाखाचा चेक


मदतीसाठी धावलेल्या 'त्या' रिक्षाचालकाला आदित्या ठाकरेंनी दिला १ लाखाचा चेक
SHARES

काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसात अडकलेल्या गर्भवती महिलेला एका रिक्षाचालकानं विरार स्थानकात उभ्या असलेल्या लोकलच्या महिला डब्यापर्यंत पोहोचवल्याची घटना घडली होती. सागर कमलाकर गावद (३४) असं या रिक्षा चालकाचं नाव असून, त्यानं विरार स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर रिक्षा चालवली होती. त्याचं या धाडसी कृत्यावर सर्वच स्तरावरून कौतुक करण्यात आलं होतं. तसंच, आता युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी या रिक्षा चालकाला १ लाख रुपयांचा चेक दिला आहे.    

नियमांच उल्लंघन 

या रिक्षा चालकानं दाखवलेल्या धाडसाचं कौतुक सर्व स्तरावरून करण्यात आलं. परंतु, रेल्वे प्रशाननाच्या नियमांच उल्लंघन केल्याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी त्याला चौकशीकरीता ताब्यात घेतलं. मात्र, काहीवेळानं समज देत त्याला पोलिसांनी सोडलं. या घटनेनंतर आदित्य ठाकरे यांनी सागर गावद याच्याशी संपर्क साधला. तसंच, शनिवारी विरार पश्चिम येथील डोंगरपाडा इथं पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत त्याला चेक दिला. 

सुखरूप प्रसूती

गर्भवतीला त्रास होऊ लागल्यानं तिला मुंबईच्या रुग्णालयात दाखल करायचे होते. त्यामुळं रिक्षा चालकानं तिला लोकलच्या विकलांग डब्याजवळ नेलं. परंतु, मुसळधार पावसामुळं रेल्वे रुळांवर प्रचंड पाणी साचल्यानं रेल्वे सेवा पूर्ण ठप्प होती. परिणामी, रेल्वेचा पुढील हा प्रवास अशक्य होता. त्यामुळं अखेर प्रसंगावधान राखीत या महिलेला रिक्षातूनच विरार नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले आणि तिथे तिची सुखरूप प्रसूती करण्यात आली.



हेही वाचा -

पूर आणि पावसामुळं भाजीपाल्याचे दर तिप्पट

'या' भाजपच्या आमदारानं घेतली राज ठाकरेंची भेट



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा