Advertisement

'चेन्नई'ला मोठा धक्का, 'या' खेळाडूचीही आयपीएलमधून माघार

चेन्नई सुपर किंग्स संघाच्या ताफ्यात कोरोना पॉझिटिव्ह सदस्यांची संख्या वाढल्यामुळं संघातील बऱ्याच खेळाडूंमध्ये भीतीचं वातावरण होतं

'चेन्नई'ला मोठा धक्का, 'या' खेळाडूचीही आयपीएलमधून माघार
SHARES

इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) १३व्या हंगामा दुबईत होणार आहे. अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले असून, या स्पर्धेतील चेन्नई सुपर किंग्स संघासमोरील अडचणी येत आहेत. संघाचा उपकर्णधार सुरेश रैनापाठोपाठ यानं काहीच दिवसांपूर्वी माघार आयपीएलमधून माघार घेतली होती. त्यानंतर आता अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंग यानंही वैयक्तिक कारणास्तव आयपीएलमधून माघार घेतली आहे.

चेन्नई सुपर किंग्स संघाच्या ताफ्यात कोरोना पॉझिटिव्ह सदस्यांची संख्या वाढल्यामुळं संघातील बऱ्याच खेळाडूंमध्ये भीतीचं वातावरण होतं. त्यामुळं रैनानं माघार घेतल्याचीही चर्चा होती. अशात हरभजनलाही हीच भीती सतावत होती आणि अखेर त्यानं आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला. चेन्नई सुपर किंग्सनं चेन्नईत आयोजित केलेल्या सराव शिबिरातही हरभजन सहभागी झाला नव्हता. तो मंगळवारी दुबईत दाखल होणं, अपेक्षित होतं. मात्र, त्याची अनुपस्थिती चर्चेचं कारण ठरली होती.

चेन्नईच्या संघातील सर्वात अनुभवी फिरकीपटू असलेल्या हरभजन सिंगनं माघार घेतल्यानं धोनीची चिंता वाढली आहे. २०१८ मध्ये हरभजन चेन्नई संघाचा सदस्य झाला. त्यानं २०१८ व २०१९ च्या पर्वात २४ सामन्यांत २३ विकेट्स घेतल्या. आयपीएलमध्ये एकूण त्यानं १६० सामन्यांत १५० विकेट्स घेतल्या आहेत.हेही वाचा -

११वी प्रवेशासाठी एक दिवसाची मुदतवाढ

Exclusive ‘त्या’ अश्लील फोनला कंटाळून ती करणार होती आत्महत्या, सायबर पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळला अनर्थ


संबंधित विषय
Advertisement