Advertisement

IPL 2020 : मलिंगा आयपीएलमधून बाहेर, मुंबई इंडियन्सला धक्का

चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा फलंदाज सुरेश रैनाने आयपीएलमधून माघार घेतल्यानंतर आता मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगानेही आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

IPL 2020 : मलिंगा आयपीएलमधून बाहेर, मुंबई इंडियन्सला धक्का
SHARES

आयपीएल च्या तेराव्या हंगामाला काहीच दिवस बाकी आहेत. चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा फलंदाज सुरेश रैनाने आयपीएलमधून माघार घेतल्यानंतर आता मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगानेही आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मुंबई इंडियन्सला मोठा झटका बसला आहे.

मलिंगाने माघार घेतली असल्याची माहिती मुंबई इंडियन्सने आपल्या ट्विटरवरून दिली आहे. त्याच्या जागी ऑस्ट्रेलियाच्या जेम्स पॅटीन्सनचा संघात बदली खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे. वैयक्तिक कारणामुळे स्पर्धेत सहभागी होता येणार नसल्याचं  मलिंगाने संघ व्यवस्थापनाला सांगितलं आहे. त्यामुळे तो श्रीलंकेत आपल्या कुटुंबासोबतच राहणार आहे. 

लसिथ मलिंगाच्या जागी जेम्स पॅटिसनला संधी देण्यात आली आहे. मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानी यांनी जेम्स पॅटीन्सन याचं संघात स्वागत केलं. तसंच मलिंगाला हवी ती मदत करण्याचं आश्वासनही दिलं आहे. मलिंगा हा मुंबई संघाचे बलस्थान होते. लसिथ मलिंगाची अनुपस्थिती आम्हाला नक्कीच जाणवेल यात वाद नाही. पण मलिंगाची अडचणदेखील आम्ही समजू शकतो, असे अनिल अंबानी म्हणाले.

मलिंगा हा आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेणारा वेगवान गोलंदाज आहे. त्याने आतापर्यंत १२२ सामन्यांमध्ये १७० बळी घेतले आहेत. दुसऱ्या स्थानी असलेल्या अमित मिश्रापेक्षा तो २३ बळींनी पुढे आहे. मलिंगाने ६ वेळा डावात चार बळी टिपले आहेत. तर एकदा डावात ५ किंवा त्यापेक्षा जास्त बळी टिपले आहेत. 



हेही वाचा -

IPL 2020 : 'अशी' आहे मुंबई इंडियन्सची नवी जर्सी, नक्की बघा, तुम्हालाही आवडेल...

IPL 2020 : खेळाडूंसंदर्भात युएईच्या क्रिकेट बोर्डाचा महत्त्वाचा निर्णय


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा