Advertisement

कोरोनामुळं भारतीय संघाचे 'हे' दोन्ही दौरे रद्द

भारतीय क्रिकेट संघ श्रीलंका आणि झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार नसल्याचं शुक्रवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) जाहीर केले.

कोरोनामुळं भारतीय संघाचे 'हे' दोन्ही दौरे रद्द
SHARES

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं क्रिकेटविश्वाला मोठा फटका बसला आहे. कोरोना व्हायरसमुळं अनेक सामने रद्द करण्यात आले आहेत. करोना व्हायरसमुळं उद्भवलेला धोका लक्षात घेता भारतीय क्रिकेट संघ श्रीलंका आणि झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार नसल्याचं शुक्रवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) जाहीर केले.

भारतीय संघ २४ जून जूनपासून श्रीलंका दौऱ्यात ३ एकदिवसीय आणि ३ टी २० मालिका खेळणार होता. तर त्यानंतर २२ ऑगस्टपासून नियोजित असलेल्या झिम्बाब्वे दौऱ्यात ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेचा समावेश होता. हे लांबणीवर टाकण्यात येतील अशी शक्यता आधी व्यक्त करण्यात येत होती. पण आता बीसीसीआयनं हे दोन्ही दौरे थेट रद्द केले आहेत.

हेही वाचा - केंद्राच्या पॅकेजमधून मिळावी उद्योगांना आर्थिक मदत - धनंजय मुंडे

कोरोनामुळं लांबणीवर पडलेली आयपीएल प्रेक्षकांविना बंद दाराआड खेळवण्यात येईल, असे संकेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा अध्यक्ष सौरव गांगुलीनं दिले आहेत. सर्व संलग्न राज्य क्रिकेट संघटनांना पत्र लिहून गांगुलीने याबाबतची माहिती दिली असून आम्ही सर्व शक्य पर्यायांचा विचार करत आहोत, असंही गांगुलीनं म्हटले आहे.



हेही वाचा -

महाराष्ट्रात पुन्हा कठोर लाॅकडाऊन? मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले, वाचा..

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना करोनाची लागण



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा