Advertisement

विजय हजारे चषकासाठी अजिंक्य रहाणेकडे मुंबईचे नेतृत्व


विजय हजारे चषकासाठी अजिंक्य रहाणेकडे मुंबईचे नेतृत्व
SHARES

इंग्लंड दौऱ्यातील भारतीय संघाच्या खराब कामगिरीनंतर टीम इंडिया अाशिया चषकासाठी दुबईला रवाना झाली अाहे. पण अाशिया चषकासाठी भारतीय संघात स्थान न मिळालेला भरवशाचा फलंदाज अजिंक्य रहाणे अाता मुंबईकडून खेळताना दिसणार अाहे. १९ सप्टेंबर ते ८ अाॅक्टोबरदरम्यान बंगळुरू येथे सुरू होणाऱ्या विजय हजारे चषकासाठी अजिंक्य रहाणेची मुंबई संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात अाली अाहे. अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, पृथ्वी शाॅ, सूर्यकुमार यादव, धवल कुलकर्णी, अादित्य तरे या दिग्गज खेळाडूंच्या समावेशामुळे मुंबई संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा बाळगली जात अाहे.


सलामीची लढत बडोदाशी

मुंबईचा एलिट अ गटात समावेश करण्यात अाला अाहे. अ गटात मुंबई, बडोदा, कर्नाटक, रेल्वे, विदर्भ, पंजाब, हिमाचल प्रदेश, गोवा अाणि महाराष्ट्र या संघांचा समावेश अाहे. ५० षटकांच्या या स्पर्धेत मुंबईची सलामीची लढत १९ सप्टेंबरला बडोद्याशी अलूर येथे होणार अाहे. अाशिया चषकात अजिंक्य रहाणे अाणि श्रेयस अय्यर यांना स्थान मिळाले नाही. इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या दोन कसोटी सामन्यांसाठी पृथ्वी शाॅचा भारतीय संघात समावेश करण्यात अाला होता. मात्र त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही.


मुंबईचा संघ :

अजिंक्य रहाणे (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), पृथ्वीशाॅ, जय बिश्त, सूर्यकुमार यादव, सिद्धेश लाड, अादित्य तरे, एकनाथ केरकर, शिवम दुबे, अाकाश पारकर, धवल कुलकर्णी, शम्स मुलानी, विजय गोहिल, तुषार देशपांडे, राॅयस्टन डायस.


हेही वाचा -

अर्जुन तेंडुलकरची मुंबईच्या १९ वर्षांखालील संघात निवड

'बाॅक्सिंग रिंगचा किंग' माइक टायसन मुंबईत येणार



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा