Advertisement

अंबाती रायडूचं असंही कमबॅक, निवृत्तीचा निर्णय मागे

काही दिवसांपूर्वी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणाऱ्या अंबाती रायडूने आपल्या निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आहे.

अंबाती रायडूचं असंही कमबॅक, निवृत्तीचा निर्णय मागे
SHARES

काही दिवसांपूर्वी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणाऱ्या अंबाती रायडूने आपल्या निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आहे. हैदराबाद क्रिकेट असोसिएशनला पत्र पाठवून आपली सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळण्याची इच्छा असल्याचं त्याने म्हटलं आहे. 

सातत्य राखण्यात अपयशी

मागील २ ते ३ वर्षांमध्ये अंबाती रायडूला मधल्या फळीत खेळण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. परंतु खेळात सातत्य दाखवता न आल्याने तो नेहमीच संघात आत बाहेर होत राहिला. त्यातच इंग्लंडमधील वर्ल्डकप संघात रायडूची निवड न झाल्याने तो दुखावला होता. परंतु त्याला राखीव खेळाडूमध्ये ठेवण्यात आल्याने वर्ल्डकप खेळायला मिळेल, ही त्याची आशा कायम होती.  

संधी डावलली

मात्र वर्ल्डकप सुरू असताना शिखर धवन आणि विजय शंकर दुखापतीमुळे संघाबाहेर पडूनही त्यांच्या जागी रायडूला संधी मिळाली नाही. बीसीसीआयने त्याच्या ऐवजी ऋषभ पंत आणि मयांक अग्रवालची   निवड केल्यामुळे हताश झालेल्या रायडूने तडकाफडकी निवृत्तीचा निर्णय जाहीर केला होता. 

काय लिहिलंय पत्रात?

'व्हीव्हीएस लक्ष्मण आणि नोएल डेव्हीड यांनी माझ्या कठीण काळात मला पाठिंबा दिला. माझ्यात अजूनही क्रिकेट शिल्लक आहे, याची जाणीव त्यांनी करून दिली. याच कारणामुळे मी माझ्या निवृत्तीचा निर्णय मागे घेत आहे. हा निर्णय मी भावनेच्या भरात घेतला होता.  

'मी निवृत्तीचा निर्णय मागे घेत असून सर्व प्रकारचा क्रिकेट खेळण्यासाठी उत्सुक आहे. पुढील मोसमात माझी हैदराबाद संघासोबत खेळण्याची इच्छा आहे. मी माझे सर्व कौशल्य पणाला लावून संघासाठी योगदान देईन. मी येत्या १० सप्टेंबरपासून हैदराबाद संघासाठी उपलब्ध असेन.'हेही वाचा-

फिरोज शहा कोटला स्टेडियमला अरूण जेटलींचं नाव

मुंबईकर अजिंक्य रहाणे ‘वन डे’ संघात का नाही? गांगुलीने केला निवड समितीला सवालसंबंधित विषय
Advertisement