Advertisement

फिरोज शहा कोटला स्टेडियमला अरूण जेटलींचं नाव

दिल्लीतील प्रसिद्ध फिरोज शहा कोटला स्टेडियमला माजी केंद्रीय अर्थमंत्री दिवंगत अरूण जेटली याचं नाव देण्याचा निर्णय दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटने (DDCA)ने घेतला आहे.

फिरोज शहा कोटला स्टेडियमला अरूण जेटलींचं नाव
SHARES

दिल्लीतील प्रसिद्ध फिरोज शहा कोटला स्टेडियमला माजी केंद्रीय अर्थमंत्री दिवंगत अरूण जेटली याचं नाव देण्याचा निर्णय दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटने (DDCA)ने घेतला आहे. अरुण जेटली यांचं नुकतंच निधन झालं आहे. १२ सप्टेंबर रोजी एका कार्यक्रमात हा नामकरण सोहळा होणार आहे. 

भाजप खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याच्या मागणीनंतर 'डीडीसीए'ने हा निर्णय घेतल्याची माहिती 'डीडीसीए'चे अध्यक्ष रजत शर्मा यांनी दिली. जेटली 'डीडीसीए'चे अध्यक्ष असताना स्टेडियमला आधुनिक रुप मिळालं. तिथं जागतिक दर्जाचं ड्रेसिंग रूम बांधण्यात आलं. स्टेडियममधील आसन क्षमता वाढली. प्रेक्षकांना चांगल्या सोई-सुविधा मिळाल्या. स्टेडियमचा कायापालट घडवून आणण्यात जेटली यांचा मोठा वाटा होता.

स्टेडियमधील एका स्टँडला विराट कोहलीचं नाव देण्याची घोषणा याआधीच करण्यात आलेली आहे. जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये होणाऱ्या सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि क्रीडामंत्री किरेन रिजीजू उपस्थित राहणार आहेत. हेही वाचा-

टीम इंडियाला दहशतवादी हल्ल्याची धमकी, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आला मेलRead this story in English
संबंधित विषय
Advertisement