Advertisement

मुंबईच्या कर्णधारपदाची धुरा धवल कुलकर्णीकडे


मुंबईच्या कर्णधारपदाची धुरा धवल कुलकर्णीकडे
SHARES

विजय हजारे ट्राॅफीमध्ये सुरेख कामगिरी करणाऱ्या मुंबई संघात बदल करण्यात अाले अाहेत. बडोदा, कर्नाटक अाणि रेल्वे या संघावर विजय मिळवून पहिले तिन्ही सामने जिंकणाऱ्या मुंबईच्या कर्णधारपदाची धुरा अाता अजिंक्य रहाणेएेवजी वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीकडे सोपविण्यात अाली अाहे. अध्यक्षीय संघ अाणि राष्ट्रीय संघातून खेळणारे मुंबईचे तीन अव्वल खेळाडू उपलब्ध नसल्याने एमसीएने हे बदल केले अाहेत.


यांची अनुपस्थिती जाणवणार

मुंबईचा एलिट गटातील विदर्भविरुद्ध सोमवारी होणारा सामना पावसामुळे रद्द करण्यात अाला. त्यामुळे मुंबईने अ गटात अव्वल स्थान पटकावले अाहे. अाता मुंबईची पुढील लढत २८ सप्टेंबर रोजी पंजाबशी होणार अाहे. मात्र मुंबईला कर्णधार अजिंक्य रहाणे, पृथ्वी शाॅ, श्रेयस अय्यर यांची अनुपस्थिती जाणवणार अाहे. पंजाब अाणि हिमाचल प्रदेश (३० सप्टेंबर) या दोन संघांविरुद्धच्या सामन्यासाठी धवलकडे नेतृत्वाची धुरा असेल.


यांना मिळणार संधी

रहाणे, श्रेयस अय्यर यांच्या जागी सलामीवीर अखिल हेरवाडकर अाणि मधल्या फळीतील फलंदाज शुभम रांजणे यांना संधी देण्यात अाली अाहे. मात्र पृथ्वी शाॅच्या जागी कुणालाही संधी देण्यात अालेली नाही.


धवल कुलकर्णी चांगली गोलंदाजी करत अाहे. एक शिस्तबद्ध खेळाडू म्हणून तो सर्वांनाच परिचित अाहे. संघातील सिनियर अाणि अनुभवी खेळाडू असलेल्या धवलला अादित्य तरे अाणि सूर्यकुमार यादव हे माजी कर्णधार नक्कीच मदत करतील, अशी अाशा अाहे. अाम्ही सांघिक कामगिरी करण्यावर भर देत अाहोत.
- विनायक सामंत, मुंबईचे प्रशिक्षक.


हेही वाचा -

विजय हजारे चषकासाठी अजिंक्य रहाणेकडे मुंबईचे नेतृत्व

माजी क्रिकेटपटूंनाही मिळणार एमसीएत मतदानाचा हक्क



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा