Advertisement

भारतीय संघात मुंबईच्या 'या' ५ खेळाडूंचा दबदबा

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं संघात अनुभवी खेळाडूंसह नव्या चेहऱ्यांना संघात स्थान दिलं आहे. यामध्ये विशेष म्हणजे मुंबईतील ५ खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.

भारतीय संघात मुंबईच्या 'या' ५ खेळाडूंचा दबदबा
SHARES

गतवर्षी झालेल्या वर्ल्ड कप २०१९मध्ये (World Cup 2019) न्यूझीलंड (New Zealand) विरूद्धच्या उपांत्य फेरीत (Semi-Final) भारतीय संघाला (Indian Cricket Team) पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियात (Australia) होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपसाठी (T-20 World Cup 2020) संघ बांधणीवरती भर देत आहे. यावेळी निवड समिती (Selection Committee) आणि संघ व्यवस्थापनेकडून भारतीय संघात नव्या विश्वासू खेळाडूंना संधी दिली जात आहे. मात्र, संधी मिळूनही काही खेळाडूंना संधीचं सोनं करता आलेलं नाही.

भारतीय संघानं श्रीलंका (Sri Lanka) व ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्ध झालेल्या सामन्यात चांगली कामगिरी करत विजय मिळवला. या मालिकांनंतर न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) संघाची घोषणा केली. यामध्ये अनुभवी खेळाडूंसह नव्या चेहऱ्यांना संघात स्थान देण्यात आलं आहे. यामध्ये विशेष म्हणजे मुंबईतील ५ खेळाडूंचा (Mumbai Players) समावेश करण्यात आला आहे.

हिटमॅन रोहित शर्मा (Rohit Sharma), श्रेयस अय्यर (Shreyas Iyer), पृथ्वी शॉ (Prithvi Shaw), शार्दुल ठाकुर (Shardul Thakur), शिवम दुबे (Shivam Dube) या ५ खेळांडूंना भारतीय संघात संधी देण्यात आली आहे. मागील काही मालिकांमध्ये रोहित शर्मासह श्रेयस अय्यर व शार्दुल ठाकुर यानी चांगली कामगिरी केली आहे. परंतु, पृथ्वी शॉ संघा बाहेर असल्यानं न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेमध्ये तो कशी खेळी करणार याकडं सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.

रोहित शर्मा

टी-२० वर्ल्ड कपसाठी (T-20 World Cup 2020) संघ बांधणीवरती भर देत असतानाच निवड समितीला रोहित वगळता इतर ४ खेळाडूंवर साशंका आहे. कारण रोहित शर्माला भारतीय संघाचा आधारस्तंभ मानला जात असून, अनेक महत्वाच्या सामन्यांमध्ये त्यांन चांगली कामगिरी करत भारतीय सघाला विजय मिळवून दिला आहे. त्याशिवाय, वर्ल्ड कपसह २०१९ (World Cup 2019) सर्वाधिक धावा करत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) मागे टाकलं होतं. सर्वाधिक धावांप्रमाणेच सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही रोहितनं आपल्या नावे केला होता.

पृथ्वी शॉ

न्यूझीलंड दौऱ्याआधी शिखर धवन (Shikhar Dhawan) जखमी झाल्यामुळे त्याच्या ऐवजी टी-२० मालिकेत संजू सॅमसन (Sanju Samson) तर वनडे मालिकेसाठी पृथ्वी शॉची (Prithvi Shaw) निवड करण्यात आली आहे. पृथ्वी शॉनं आतापर्यंतच्या अनेक सामन्यांमध्ये सलामीवीर म्हणून संघाला आधार देण्याचं काम केलं. परंतु, नोव्हेंबर २०१८ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सराव सामन्यात त्याला दुखापत झाल्यानं एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळता आला नाही. नव्या वर्षात भारत-अ (India-A) च्या न्यूझीलंड-अ (New Zealand-A) दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे. भारत-अ विरुद्ध न्यूझीलंड-अ यांच्यात झालेल्या वनडे सामन्यात पृथ्वीनं धडाकेबाज फलंदाजी करत ४८ धावा केल्या. त्याशिवाय, भविष्यात भारतीय संघाला सलामीवीरासाठी पर्याय उपलब्ध होऊ शकतो.

श्रेयस अय्यर

मधल्या फळीत चांगल्या फलंदाजीसाठी श्रेयस अय्यर हा भारतीय संघाला उत्तम पर्याय आहे. मुंबईचा खेळाडू असलेला श्रेयस १५ वनडे आणि १७ टी-२० सामन्यात भारतासाठी खेळलेला आहे. तसंच, आतापर्यंत स्थानिक क्रिकेट व अ संघातून खेळताना अप्रतिम कामगिरी केली आहे. डिसेंबर २०१७ मध्ये श्रेयसनं श्रीलंका (Sri Lanka) विरुद्धच्या वनडे (ODI) सामन्यात पदार्पण केलं, तसंच याचवर्षी टी-२० (T-20) मध्येही पदार्पण केलं. १५ वनडे सामन्यांमध्ये श्रेयसनं ६ अर्धशतकांच्या जोरावर ५३१ धावा केल्या आहेत.

दरम्यान, नव्या वर्षातील न्यूझीलंड दौऱ्यासाठी त्याची निवड करण्यात आली असून, या दौऱ्यातील टी-२० मालिकेच्या पहिल्याच सामन्यात धडाकेबाज फलंदाजी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. श्रेयसनं २९ चेंडूत ३ षटकार व ५ चौकार मारत अर्धशतकी खेळी केली.

शार्दुल ठाकूर

जसप्रित बुमराह (jasprit bumrah), मोहम्मद शमी (Mohammad Shami), भुवनेश्वर कुमार (Bhuvaneshwar Kumar) या जलद गोलंदाजांच्या यादीत मुंबईकर शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) हाही मोडतो. शार्दुल स्वत:च्या कौशल्यावर सातत्यानं मेहनत घेत असल्याचं चित्र आहे. शार्दुलनं पहिला टी-२० सामना २२ महिन्याआधी खेळला होता. श्रीलंके विरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात त्यानं २३ धावात ३ गडी बाद केले होते. २०१८ साली श्रीलंके विरुद्धकेलेल्या गोलंदाजीच्या तुलनेत यावेळी डेथ ओव्हरमध्ये त्यानं सुधारणा केल्याचं निष्पन्न झालं आहे.

शार्दुल ठाकूर ८ वनडे (ODI) सामने खेळला असून यामध्ये ८ विकेट घेतल्या आहेत. १० टी-२० (T-20) सामने खेळला असून, यामध्ये १३ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचप्रमाणं, १ कसोटी (Test) खेळला आहे. शार्दुलनं २०१७ मध्ये श्रालंकेविरुद्धच्या वनडे सामन्यात भारतीय संघात पदार्पण केलं होतं. तर, २०१८ मध्ये वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोट सामन्यात पदार्पण केलं. याच वर्षी टी-२० मध्येही पदार्पण केलं आहे.

शिवम दुबे

शिवम हा एक अष्टपैलू (All-rounder) खेळाडू आहे. फलंदाजी तसंच गोलंदाजीनं संघात योगदान देण्याची त्याची क्षमता आहे. आजवर शिवमनं घरगुती क्रिकेटमध्ये सलग ५ चेंडूत ५ षटकारदेखील ठोकले आहेत. गतवर्षी १० ऑक्टोबरला कर्नाटक (Karnataka) आणि मुंबई (Mumbai) यांच्यात सामना झाला. या सामन्यामध्ये कर्नाटकनं ९ धावांच्या फरकानं विजय मिळवला. मात्र, या सामन्यात मुंबईचा अष्टपैलू शिवम दुबे यानं शानदार खेळी करत ६७ चेंडूत ११८ धावांची शतकी खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ७ चौकार आणि १० षटकार ठोकले. त्याच्या या खेळीनंतप 'त्याला टीम इंडियाच्या टी-२० संघात स्थान देण्यात यावं', या मागणीनं सोशल मीडियावर जोर धरला होता.

भारत आणि बांग्लादेश (Bangladesh) क्रिकेट संघ यांच्यात दिल्लीत खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाकडून (Indian Team) मुंबईचा युवा खेळाडू शिवम दुबे (Shivam Dube) यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात केली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यावर निवड समिती आणि संघ व्यवस्थापनानं त्याला भारतीय संघामध्ये संधी देण्याचा निर्णय घेतला. शिवमने बांग्लादेश पहिल्या टी-२० मॅचमधून क्रिकेटच्या या छोट्या स्वरूपात पदार्पण केलं.



हेही वाचा -

चेंबुरमध्ये बेस्ट बसची तोडफोड, वंचितच्या 'महाराष्ट्र बंद'ला हिंसक वळण

१०० रुपयांच्या थाळीसाठी मोजले १ लाख, गिरगावातील व्यापाऱ्याची आॅनलाइन फसवणूक



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा