Advertisement

भारतीय संघाचे माजी कसोटीपटू माधव आपटे यांचं निधन

माजी कसोटीपटू आणि उद्योजक माधव आपटे यांचे मुंबईत निधन झालं.

भारतीय संघाचे माजी कसोटीपटू माधव आपटे यांचं निधन
SHARES

भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू, कसोटीपटू आणि उद्योजक माधव आपटे यांचं मुंबईत सोमवारी सकाळी वृद्धापकालानं निधन झालं. ते ८६ वर्षांचे होते. आपटे यांनी १९५२ ते १९५३ या कालावधीत ७ कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केलं. तसंच, माधव आपटे यांनी 'क्रिकेट क्लब ऑफ इंडिया'चे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळलेली आहे.

फिरकी गोलंदाज

माधव आपटे यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात १९४८ साली केली होतीफलंदाज म्हणून त्यांना ओळखलं जात होते. मात्र, ते सुरुवातीला फिरकी गोलंदाज होते. एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांनी विनू मंकड यांच्याकडून गोलंदाजीचे धडे घेतले होते. त्याशिवाय आपटे यांनी सर डॉन ब्रॅडमन यांना त्यांच्या शेवटच्या इनिंमध्ये १०० ची सरासरी घेण्यापासून रोखलं होतं. ते १९ वर्षांचे असताना त्यांनी मेरीलबोन क्रिकेट क्लब विरुद्ध भारतीय विद्यापीठांचं प्रतिनिधीत्व केलं होतं. तसंच त्यांचं हे प्रथम दर्जाच्या क्रिकेटमधील पदार्पण होतं.

सर्वाधिक धावा 

सन १९५३ मध्ये आपटे यांची वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झाली. त्यावेळी ते पॉली उमरीगर यांच्यानंतर सर्वाधिक धावा करणारे क्रिकेटपटू ठरले होते. त्यानंतर सन १९५४ मध्ये त्यांनी केवळ एकच प्रथम दर्जा क्रिकेटचा सामना खेळला. मात्र, या सामन्यानंतर त्यांची भारतीय संघासाठी कधीही निवड झाली नाही.

३४ व्या वर्षी निवृत्ती 

माधव आपटे यांनी ३४ व्या वर्षी निवृत्ती जाहीर केली. आपटे डी. बी. देवधर ते मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसोबत क्रिकेट खेळले आहेत. ते बीसीसीआयचे संस्थापक सदस्यही होते. त्यांनी क्लब्स लेजंड क्लबचंही प्रमुखपद सांभाळलं होतं. आपटे हे मुंबई चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष होते. सध्यस्थितीत ते आपटे ग्रुपच्या प्रमुखपदाची जबाबदारी सांभाळत होते.



हेही वाचा -

विधानसभा निवडणूक २०१९: शिवसेनेला ११८ जागा देण्यास भाजप तयार

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसवर आचारसंहितेचं सावट



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा