Advertisement

क्रिकेटचा देव झाला ४५ वर्षांचा


क्रिकेटचा देव झाला ४५ वर्षांचा
SHARES

क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा सर्वांचा लाडका सचिन तेंडुलकरचा मंगळवारी ४५ वा वाढदिवस. आज मास्टर-ब्लास्टर म्हणून सर्वांना परिचित असलेल्या सचिन तेंडुलकरचा जन्म २४ एप्रिल १९७३ मध्ये शिवाजीपार्क, रानडे रोड येथील निर्मल नर्सिंग होममध्ये झाला.

सचिन तेंडुलकरला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड. वयाच्या १६ वर्षीच क्रिकेट विश्वात आपला पाया भक्कम केला. वयाच्या ४० व्या वर्षापर्यंत क्रिकेट जगतात अनेक विक्रम त्याने नोंदवले. सचिनने पहिला आंतरराष्ट्रीय सामना १९८९ साली पाकिस्तानविरुद्ध खेळला.

सचिनने क्रिकेट विश्वात इतके विक्रम केले की त्याच्या चाहत्यांनी त्याला 'क्रिकेटचा देवा'चा दर्जा दिला. सचिनने भारतात क्रिकेटची व्याख्याच बदलून टाकली. त्याने २०० टेस्ट मॅच, ४६३ वनडे खेळले आहेत.


सचिनचे रेकॉर्ड

  • १२ हजार कसोटी धावांचा पल्ला गाठणारा पहिला जागतिक फलंदाज
  • एकदिवसीय कारकिर्दीत १८ हजार ४२६ धावा
  • सर्वाधिक ४९ शतके
  • सर्वाधिक ९६ अर्धशतके
  • कसोटी कारकिर्दीमध्ये १५ हजार ५३३ धावा
  • दहा हजार कसोटी धावांचा टप्पा सर्वात कमी डावांमध्ये गाठण्यात संयुक्त प्रथम स्थान
  • तेंडुलकर आणि ब्रायन लारा या दोघांनीही १९५ डावांमध्ये हा पल्ला गाठला
  • एका वर्षात १००० धावा
    १९९७ (१००० धावा)
    १९९९ (१०८८ धावा)
    २००१ (१००३ धावा)
    २००२ (१३९२ धावा)
    २००८ (१०६३ धावा)
    २०१० (१५६२ धावा)
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा