Advertisement

'विराट' कामगिरी, कोहलीची आयसीसी पुरस्कारांची हॅट्रिक


'विराट' कामगिरी, कोहलीची आयसीसी पुरस्कारांची हॅट्रिक
SHARES

आपल्या धडाकेबाज फलंदाजीनं प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारत आपल्या नावावर एकसे एक विक्रम नोंदवण्याची विराट कामगिरी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीकडून सुरू आहे. आता त्यात आणखी एका विक्रमाची भर पडली आहे. आयसीसीनं मंगळवारी 'टीम आॅफ द इयर'ची घोषणा केली असून आयसीसीच्या या पुरस्कारांमध्ये विराटचीच छाप दिसून येत आहे. 'सर्वोत्तम क्रिकेटपटू', 'सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू' आणि 'सर्वोच्च कसोटीपटू' असे तीन पुरस्कार पटकावत विराटनं पुरस्कारांचीही हॅट्रिक मारली आहे. त्याच्या या कामगिरीचं क्रिकेट जगतात कौतुक होत आहे.


विराट कोहलीची हॅट्रीक

आयसीसीनं मंगळवारी विराट कोहलीची 'क्रिकेटर ऑफ द इयर', 'टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर' आणि 'वनडे क्रिकेटर ऑफ द इयर' म्हणून निवड केली आहे. विराटला क्रिकेटच्या कारकिर्दीतील आयसीसीचा 'टेस्ट प्लेअर ऑफ द इयर' हा किताब पहिल्यांदाच मिळाला आहे. त्याचप्रमाणं विराटने २०१८ मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये १३३.५५ च्या सरासरीनं एकूण १२०२ धावा केल्या आहेत. त्यानुसार मागील वर्षी विराट सर्वात जलद १० हजार धावा करणारा खेळाडूही ठरला होता. याच कामगिरीच्या जोरावर विराटला त एकदिवसीय क्रिकेटसाठी 'वनडे क्रिकेटर ऑफ द इयर' हा किताब देण्यात आला आहे. विराटला हा किताब दुसऱ्यांदा मिळाला आहे.


टीम ऑफ द इयर

मंगळवारी आयसीसीनं 'टीम ऑफ द इयर'चीही घोषणा केली आहे. या संघात २०१८ मध्ये केलेल्या कामगिरीनुसार निवडण्यात आलेल्या खेळाडूंचा समावेश आहे. दरम्यान या संघात देखील टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं बाजी मारली आहे. आयसीसीनं कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार घोषित केलं आहे.

या संघात विराटसह टीम इंडियाचा जलदगती गोलंदाज जसप्रित बुमराहला आयसीसीच्या दोन्ही संघांमध्ये स्थान मिळालं आहे. त्याचबरोबर युवा फलंदाज ऋषभ पंत याला कसोटी संघात स्थान मिळालं आहे. एकदिवसीय संघात विराट आणि बुमराह यांच्यासह सलामीचा फलंदाज रोहित शर्मा आणि चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादव यांची निवड करण्यात आली आहे.

संघ

रोहित शर्मा (भारत)
जॉनी बेयरस्टो (इंग्लंड)
विराट कोहली (भारत) (कर्णधार)
जो रूट (इंग्लंड)
रॉस टेलर (न्यूझीलंड)
जोस बटलर (इंग्लंड) (यष्टिरक्षक)
बेन स्टोक्स (इंग्लंड)
मुश्तिफिजूर रहमान (बांगलादेश)
राशिद खान (अफगाणिस्तान)
कुलदीप यादव (भारत)
जसप्रीत बुमराह (भारत)



हेही वाचा -

चहलची दमदार कामगिरी, आॅस्ट्रेलियाच्या भूमीत विकेटसचा सिक्सर

तिसऱ्या वनडेत भारताचा एेतिहासिक विजय, मालिका खिशात



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा