Advertisement

टेस्ट मॅचमध्ये 'टाॅस' तर होणारच!


टेस्ट मॅचमध्ये 'टाॅस' तर होणारच!
SHARES

कसोटी क्रिकेटमधून नाणेफेक हद्दपार होणार, अशी शिफारस गेल्या महिन्यांत अायसीसीच्या क्रिकेट समितीने केली होती. मात्र अनिल कुंबळे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत सुरू असलेल्या अायसीसीच्या क्रिकेट समितीने अाता कसोटी सामन्यात नाणेफेक होणारच, असा निर्णय घेतला अाहे. मात्र पारंपरिक कसोटी सामन्यात गैरवर्तन करणाऱ्या खेळाडूंवर कठोर कारवाई करण्याची शिफारस अायसीसीकडे केली अाहे.


अायसीसीच्या क्रिकेट समितीनं पाहुण्या संघाला नाणेफेक बहाल करण्याच्या प्रस्तावावर चर्चा केली. पण नाणेफेक हा खेळाचा अविभाज्य भाग असल्याच्या मतावर सर्वांचेच एकमत झाले. त्यामुळे यापुढेही कसोटी सामन्यात नाणेफेक कायम राहणार, असा निर्णय क्रिकेट समितीनं घेतला अाहे.
- अायसीसी


यापुढे गैरवर्तन खपवून घेणार नाही

दोन दिवस रंगलेल्या या बैठकीत खेळाडूंच्या गैरवर्तनाविषयीही चर्चा करण्यात अाली. काही महिन्यांपूर्वी स्टीव्ह स्मिथ अाणि डेव्हिड वाॅर्नर यांनी चेंडू कुरतडण्याचे कृत्य केले होते. त्यामुळे यापुढे खेळाडूंकडून गैरवर्तन होऊ नये, यासाठी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची शिफारस क्रिकेट समितीनं केली अाहे.


क्रिकेट समितीनं सुचवलेल्या शिफारशी

  • चेंडू कुरतडणाऱ्या खेळाडूंवर कठोर कारवाई व्हावी.
  • अाक्रमक, वैयक्तिक, अपमानजनक, प्रक्षोभक कृत्ये करणाऱ्यांसाठी नवे नियम असावेत.
  • एखाद्याची शिक्षा कमी करणे अथवा वाढवणे किंवा त्याच्यावर बंदी घालण्याचे अधिकार सामनाधिकाऱ्यांना द्यावेत.
  • अादरयुक्त अाचारसंहिता बनवली जावी.


खेळाडूंच्या वर्तनाबाबत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात अाली. माइक गेटिंग अाणि डेव्हिड बून यांनी याविषयी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल मी त्यांचा अाभारी अाहे. अाता अाम्ही केलेल्या शिफारशी अंतिम मंजुरीसाठी अायसीसीच्या मुख्य कार्यकारी समितीकडे अाणि अायसीसी बोर्डाकडे पाठवल्या अाहेत.
- अनिल कुंबळे, अायसासीच्या क्रिकेट समितीचे अध्यक्ष


हेही वाचा -

कसोटीतून 'टाॅस' होणार हद्दपार?

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा