Advertisement

भारत - ऑस्ट्रेलिया पहिला एकदिवसीय सामना २४ फेब्रुवारीला

सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ च्या फरकाने विजय मिळवला आहे. या दौऱ्यातील ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका १२ जानेवारी ते १८ जानेवारीपर्यंत खेळण्यात येणार आहे.

भारत - ऑस्ट्रेलिया पहिला एकदिवसीय सामना २४ फेब्रुवारीला
SHARES

येत्या फेब्रुवारी महिन्यात ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा निश्चित झाला असून या दौऱ्याचे वेळापत्रक भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) नं जाहीर केलं आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात दोन टी-२० आणि ५ एकदिवसीय सामने होणार आहेत. पहिला सामना २४ फेब्रुवारीला बंगळुरू येथे खेळवण्यात येणार आहे.


त्यानंतर न्यूझीलंड दौरा

सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ च्या फरकाने विजय मिळवला आहे. या दौऱ्यातील ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका १२ जानेवारी ते १८ जानेवारीपर्यंत खेळण्यात येणार आहे. त्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे.


३ टी २० सामने

भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यासाठी गेल्यानंतर श्रीलंकेचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर येणार आहे. श्रीलंके विरुद्धचे समाने खेळल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ फेब्रुवारी महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. त्यावेळी ऑस्ट्रेलिया ३ टी २० आणि ५ एकदिवसीय सामने खेळणार आहे. २४ आणि २७ फेब्रुवारीला टी २० मालिका होणार असून २ ते १३ मार्चदरम्यान  ५ एकदिवसीय मालिका होणार आहे.


टी २० मालिका

  • पहिला टी२० सामना - २४ फेब्रुवारी – बंगळूरू
  • दुसरा टी२० सामना - २७ फेब्रुवारी – विशाखापट्टणम


एकदिवसीय मालिका

  • पहिला वन-डे सामना - २ मार्च – हैदराबाद
  • दुसरा वन-डे सामना - ५ मार्च – नागपूर
  • तिसरा वन-डे सामना - ८ मार्च – रांची
  • चौथा वन-डे सामना - १० मार्च – मोहाली
  • पाचवा वन-डे सामना - १३ मार्च – दिल्ली



हेही वाचा - 

हार्दिक पांड्याला बीसीसीआयची नोटीस

यंदाची आयपीएल भारतातच, २३ मार्चला पहिला सामना




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा