Advertisement

भारत वि. इंग्लंड: क्वारंटाइननंतर दोन्ही संघ सरावासाठी सज्ज

ऑस्ट्रेलियानंतर दोऱ्यानंतर भारतीय संघाची मायदेशात इंग्लंडशी लढत होणार आहे.

भारत वि. इंग्लंड: क्वारंटाइननंतर दोन्ही संघ सरावासाठी सज्ज
SHARES

ऑस्ट्रेलियानंतर दोऱ्यानंतर भारतीय संघाची मायदेशात इंग्लंडशी लढत होणार आहे. येत्या ५ फेब्रुवारीपासून सुरू होत असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारत आणि इंग्लड संघ चेन्नईत विलगीकरणात आहेत. दोन्ही संघांतील खेळाडूंची दुसरी कोरोना चाचणी सोमवारी निगेटिव्ह आली. आता उभय संघ मंगळवारपासून प्रत्यक्ष सरावात सहभागी होऊ शकणार आहे.

खेळाडूंचा ६ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी संपला असून, खेळाडू आऊटडोअर आणि नेटमध्ये सराव करू शकणार आहेत. मालिकेतील पहिले दोन्ही सामने चेन्नईतील चेपॉक मैदानावर होणार आहेत. त्यानंतरचे दोन्ही सामने अहमदाबाद इथं होणार आहेत. कसोटी मालिका ८ मार्च रोजी संपणार असून, १२ मार्चपासून टी-२० आणि २३ मार्चपासून वन-डे मालिका खेळविली जाणार आहे.

ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक मालिका विजय नोंदविणाऱ्या भारतीय खेळाडूंना इथं क्वारंटाईन होण्याआधी कुटुंबासोबत वेळ घालविण्याची संधी मिळाली होती. बुधवारी आगमन झाल्यानंतर सर्व खेळाडूंना वेळोवेळी आरटीपीसीआर चाचणीला सामोरं जावं लागलं होतं. मात्र, चाचण्या यशस्वी झाल्यामुळं आता ३ दिवस सराव करता येणार आहे.



हेही वाचा -

रेल्वे प्रवासी संख्येत वाढ

रेल्वे मार्गावर मास्कविना प्रवास करणाऱ्या 'इतक्या' जणांवर कारवाई


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा