Advertisement

रोहित शर्माचा डबल रेकॅार्ड

एक दिवसीय सामान्यांमध्ये ट्रीपल डबल सेंच्युरी मारणारा एकमेव फलंदाज ठरलेल्या रोहित शर्माने टी-२० सामन्यांमध्ये डबल रेकॅार्ड केला आहे. रोहितने न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावत टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करत शंभरावा षटकार ठोकला आहे.

रोहित शर्माचा डबल रेकॅार्ड
SHARES

एक दिवसीय सामान्यांमध्ये ट्रीपल डबल सेंच्युरी मारणारा एकमेव फलंदाज ठरलेल्या रोहित शर्माने टी-२० सामन्यांमध्ये डबल रेकॅार्ड केला आहे. रोहितने न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावत टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करत शंभरावा षटकार ठोकला आहे.

ऑकलंड येथे खेळला गेलेला भारत विरुद्ध न्यूझीलंड हा दुसरा टी-२० सामना रोहितसाठी लक्षणीय ठरला. या सामन्यात 'हिटमॅन' रोहित शर्माने दोन नवे विक्रम आपल्या नावे केले. रोहितने २८ चेंडूंत अर्धशतक झळकावत टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा इतिहास रचला. तसंच, न्यूझिलंडनं समोर ठेवलेल्या १५९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहितनं तिसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर षटकार मारला. रोहितने मारलेला हा षटकार टी-२० क्रिकेटमधील १०० वा षटकार ठरला.


सर्वाधिक धावा

या सामन्यात रोहितने २९ चेंडूंत ३ चौकार आणि ४ षटकार मारत ५० धावा केल्या. या अर्धशतकी खेळीमुळे टी-२० क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर २२७६ धावा जमा झाल्या आहेत. याआधी टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गप्टिल याच्या नावावर होता. गप्टीलचा विक्रम मोडण्यासाठी रोहितला ३५ धावांची गरज होती. या सामन्यात २९ चेंडूंत अर्धशतक ठोकून रोहितनं गप्टीलला मागे टाकलं. रोहितने ही कामगिरी ९२ सामन्यांत केली असून, गप्टीलने ७६ सामन्यांत केली होती.


शंभरावा षटकार

सर्वाधिक धावांचा विक्रम नावावर करत रोहितने षटकरांचाही इतिहास रचला आहे. या सामन्यातील चौथा षटकार रोहितचा टी-२० क्रिकेटमधील १०० वा षटकार ठरला असून, आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटच्या इतिहासात १०० षटकार लगावणारा रोहित पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. १०० वा षटकार ठोकरणारा रोहित आता संपूर्ण जगातला दुसरा फलंदाज बनला आहे.



हेही वाचा -

गेटवे ऑफ इंडियाचे होणार सुशोभिकरण

टी-२० वर्ल्ड कपच वेळापत्रक जाहीर, पण भारत, पाकिस्तान संघ वेगवेगळ्या गटात



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा