Coronavirus cases in Maharashtra: 212Mumbai: 85Islampur Sangli: 25Pune: 24Nagpur: 14Pimpri Chinchwad: 12Kalyan: 6Ahmednagar: 5Thane: 5Navi Mumbai: 4Yavatmal: 4Vasai-Virar: 4Satara: 2Panvel: 2Ulhasnagar: 1Aurangabad: 1Ratnagiri: 1Sindudurga: 1Kolhapur: 1Pune Gramin: 1Godiya: 1Jalgoan: 1Palghar: 1Buldhana: 1Nashik: 1Gujrat Citizen in Maharashtra: 1Total Deaths: 8Total Discharged: 35BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

भारतीय संघाची घोषणा; रोहितच्या जागी मयांकची निवड

वनडे (ODI) व कसोटी (Test) सामन्यातून माघार घेतली आहे. रोहितच्या जागी मयांक अग्रवालची (mayank agarwal) वनडे संघात निवड करण्यात आली आहे.

भारतीय संघाची घोषणा; रोहितच्या जागी मयांकची निवड
SHARE

न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध भारत (India) यांच्यात माउंट माउंगनुई येथील बे ओव्हल मैदानावर झालेल्या पाचव्या व अंतिम टी-२० (T-20) सामन्यात हिटमॅन रोहित शर्मा (Hit-man Rohit Sharma) याच्या पायाला दुखापत झाली. या दुखापतीमुळं त्याला फलंदाजी करताना मैदान सोडावं लागलं. दुखापत (Injury) गंभीर असल्यानं रोहितला क्षेत्ररक्षणासाठी देखील येत आलं नाही. त्यामुळं या सामन्यात के.एल. राहुलनं (K.L. Rahul) कर्णधारपदाची (Captain) जबाबदारी पार पाडली. मात्र, आता टी-२० मालिकेनंतर होणाऱ्या वनडे (ODI) व कसोटी (Test) सामन्यातून माघार घेतली आहे. रोहितच्या जागी मयांक अग्रवालची (mayank agarwal) वनडे संघात निवड करण्यात आली आहे.

रोहितला दुखापतीतून सावरण्यासाठी बराच वेळ लागणार आहे. त्यामुळं रोहितला उर्वरित न्यूझीलंड दौऱ्यालाही मुकणार आहे. बीसीसीआयनं (BCCI) मंगळवारी सकाळी न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी (Test) संघासाठीची घोषणा केली. कसोटी संघात रोहितच्या जागी शुभमन गील (Shubman Gill) याचा समावेश करण्यात आला आहे. धडाकेबाज सलामीवीर पृथ्वी शॉला (prithvi shaw) देखील न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे.

हेही वाचा - मुंबईकर रोहितची वनडे-कसोटीतून माघार, भारतीय संघाला मोठा धक्का

मयांक अग्रवाल (mayank agarwal) याला वनडे (ODI) संघात स्थान देण्यात आलं आहे. मयांक हा राहुल आणि पृथ्वी शॉ यांच्यासह तिसरा सलामीचा फलंदाज असणार आहे. याआधी वेस्ट इंडिजविरुद्धच्या (West Indies) मालिकेत शिखर धवनला (Shikhar Dhawan) दुखापत झाली होते तेव्हा मयांकनंच सलामीचा फलंदाज म्हणून भूमिका पार पाडली. त्याशिवाय, कसोटी (Test) संघात रोहितच्या अनुउपस्थितीत राहुल आणि पृथ्वीला शुभमन गिलची (Shubman Gill) साथ असणार आहे.

हेही वाचा - तिथीचा हट्ट सोडा, शिवजयंतीसाठी मुख्यमंत्र्यांना कुणी केलं आवाहन?

शुभमन गिल यानं (Shubman Gill) न्यूझीलंड अ संघाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ८३ आणि नाबाद २०४ धावा केल्या होत्या. त्याआधी दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात सलामीचा फलंदाज म्हणून तो मैदानात उतरला होता.

भारतीय कसोटी संघ

विराट कोहली (कर्णधार), मयांक अग्रवाल, पृथ्वी शॉ, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, वृद्धिमान साहा, ऋषभ पंत, आर.अश्विन, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, इशांत शर्मा.हेही वाचा -

क्लस्टर उद्घाटनाचे निमंत्रण विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांना नाही

आर्थिक मंदीचा फटका; यंदा पालिकेचा अर्थसंकल्पाला?संबंधित विषय
ताज्या बातम्या