Advertisement

आर्थिक मंदीचा फटका यंदा पालिका अर्थसंकल्पाला?

आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर विकास कामांना कात्री आणि खर्चात कपात करावी, असे आदेश दिल्याचे कळते.

आर्थिक मंदीचा फटका यंदा पालिका अर्थसंकल्पाला?
SHARES

देशात सर्वात श्रीमंत म्हणून ओळखल्या जणाऱ्या मुंबई महापालिके(BMC)च्या अर्थसंकल्पा(BMC Budget)ला आता काही वेळात सुरूवात होईल. मात्र यंदाच्या अर्थ संकल्पाला आर्थिक मंदी((Economic downturn)चा फटका बसण्याची शक्यता काही तज्ञांनी वर्तवली आहे. त्यातच पालिकेच्या कराची वसुली योग्य प्रमाणात न झाल्यामुळे २०२० ते २१ च्या अर्थसंकल्पात त्याचे परिणाम दिसण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पाचे आकारमान घटून २७ ते २८ हजार कोटींवर येण्याची शक्यता असून आर्थिक टंचाईमुळे मुंबईमधील महत्वाची विकासकामे (Development wor) रखडण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचाः- शर्जिल इमामच्या समर्थनार्थ घोषणा देणाऱ्या उर्वशी चुडावालासहीत 51 जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल

मुंबईत वेगाने सुरू असलेल्या कामांना आता आर्थिक मंदीचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्याचे परिणाम मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पाला बसल्यास शहरात सुरू असलेल्या कामांची गती ही संत होऊ शकते.  स्थावर मालमत्ता क्षेत्रांमध्ये आलेली मंदी, नवीन मालमत्तांच्या कर आकारणीत झालेली घट आणि भांडवली मूल्याधारित कराची अंमलबजावणी न झाल्याने त्यात भर पडली आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनीही आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर विकास कामांना कात्री आणि खर्चात कपात करावी, असे आदेश दिल्याचे कळते. या सर्वाचे परिणाम मुंबईची नवी ओळख होऊ पाहणारे कोस्टल रोड (Coastal road), गोरेगाव-मुलुंड लिंक रोड(Goregaon-Mulund Link Road)सह विविध पायाभूत प्रकल्पांना यापूर्वीच बसला आहे.

हेही वाचाः- पती-पत्नीच्या नावे घराची नोंदणी करणाऱ्यांना करामधून सूट द्या- शितल म्हात्रे

पालिकेचे उत्पन्न घटल्याने खर्चाचे प्रमाण खाली आले आहे. त्यामुळे महत्त्वाच्या प्रकल्पांची कामे मागील वर्षभरात पाच ते सात टक्क्यांपेक्षा पुढे सरकू शकलेली नाहीत. सन २०१९-२० चा मुंबई पालिकेचा अर्थसंकल्पीय अंदाजे ३० हजार ६९२ कोटीचा होता. यंदाच्या डिसेंबरपर्यंत फक्त १२ हजार कोटी खर्च झाले आहेत, असे प्रशासनाने म्हटले आहे. त्यामुळे २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात शिक्षण, आरोग्य वगळता बहुतांश कामांवरील खर्चाच्या तरतुदी कमी केल्या जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचाः-महापालिकेच्या फेरीवाला क्षेत्रांना दादरवासीयांचा विरोध


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा