कसोटी अजिंक्यपद स्पर्धा: भारतीय संघाच्या खात्यात २४० गुण

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या तिसऱ्या आणि अंतीम कसोटी सामन्यात भारतीय संघान विजय मिळवला आहे.

कसोटी अजिंक्यपद स्पर्धा: भारतीय संघाच्या खात्यात २४० गुण
SHARES

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या तिसऱ्या आणि अंतीम कसोटी सामन्यात भारतीय संघान विजय मिळवला आहे. भारतीय संघानं कसोटी मालिकेत आफ्रिकन संघाला ‘व्हाइटवॉश’ दिला. तसंच, क डाव आणि २०२ धावांनी विजय मिळवत भारताने मालिका ३-० ने जिंकली. या विजयासह भारतीय संघानं एक नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

२४० गुणांची कमाई 

भारतीय संघानं दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवत कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे. तसंच, २४० गुणांची कमाई केली. विशेष म्हणजे या अजिंक्यपद स्पर्धेतील इतर ८ संघांचे मिळून जेवढे गुण आहेत, त्या पेक्षाही जास्त गुण एकट्या भारतानं कमावले आहेत. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारताचे २४० गुण आहेत.

एकट्याचे गुण

न्यूझीलंड आणि श्रीलंका प्रत्येकी ६० गुणांवर आहेत. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया प्रत्येकी ५६ गुणांवर आहेत. तर विंडीज, बांगलादेश, आफ्रिका आणि पाकिस्तान यांनी अद्याप खातं उघडलेलं नाही. त्यामुळं इतर ७ संघांचे मिळून २३२ गुण आहेत, तर भारताचे एकट्याचे २४० गुण आहेत.

४९७ धावा

भारतीय संघानं तिसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करत ४९७ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेचा पहिला डाव १६२ धावांवर तर फॉलो-ऑन नंतरचा डाव १३३ धावांवर आटोपला. सामन्याच्या चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाला अणि अवघ्या काही मिनिटात खेळ संपला. त्यामुळं एक डाव आणि २०२ धावांनी विजय मिळवत भारताने मालिका ३-० नं जिंकली.हेही वाचा -

तुम्हाला ‘इथं’ मिळेल १० रुपयांत जेवण, शिवसेनेची घोषणा प्रत्यक्षात

येत्या ३६ तासांमध्ये मुंबईत पावसाची शक्यतासंबंधित विषय