Advertisement

भारताने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजीचा निर्णय

पाच सामन्यांच्या या वनडे मालिकेत दोन्ही संघांनी १-१ अशी बरोबरी केली आहे. त्यामुळे आजचा सामना मालिकेत आघाडी मिळवण्याच्या दृष्टीने दोन्ही संघांना खेळावा लागणार आहे. मात्र हा सामाना कोण जिंकणार याकडे आता सर्व क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे.

भारताने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजीचा निर्णय
SHARES
Advertisement

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातीला चौथा वन डे सामना सोमवारी मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवण्यात येत असून भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

पाच सामन्यांच्या या वनडे मालिकेत दोन्ही संघांनी १-१ अशी बरोबरी केली आहे. त्यामुळे आजचा सामना मालिकेत आघाडी मिळवण्याच्या दृष्टीने दोन्ही संघांना खेळावा लागणार आहे. मात्र हा सामाना कोण जिंकणार याकडे आता सर्व क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे.

१-१ ने बरोबरी

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात २१ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरदरम्यान ही एक दिवसीय मालिका सुरू राहील. कसोटी मालिका २-० ने गमावल्यानंतर वेस्ट इंडिजने पहिला एकदिवसीय सामनाही गमावला होता. परंतु, दुसऱ्या सामन्यात ३०० हून अधिक धावांचा पाठलाग करत त्यांनी सामना टाय केला. त्यानंतर तिसरा सामन्यात भारताला ४३ धावांनी पराभूत केले. त्यामुळे पाच वन-डे सामन्याच्या मालिकेत वेस्ट इंडिजने १-१ अशी बरोबरी साधली आहे.हेही वाचा - 

विराटच्या 'ओव्हरस्पीड'वर मुंबई पोलिस खूश, चलान कापणार नाही!

सचिनचा विक्रम विराटच्या नावावर; वन डे मध्ये १० हजार धावा पूर्ण

संबंधित विषय
Advertisement