Advertisement

'कसोटी'च्या क्रमवारीत भारत अव्वल स्थानी कायम

भारतीय संघानं आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे.

'कसोटी'च्या क्रमवारीत भारत अव्वल स्थानी कायम
SHARES

भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतानं २०३ धावांना दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आहे. विशाखापट्टणम इथं हा कसोटी खेळविण्यात आला होता. या सामन्यात भारतीय संघानं विजय मिळवत आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे.

अव्वल स्थानी

सध्यस्थितीत भारतीय संघ १६० गुणांसह अव्वल स्थानी आहे. आताप झालेल्या ३ सामन्यांमध्ये भारतीय संघ विजयी झाला आहे.  या क्रमवारीत भारतीय संघानंतर न्यूझीलंड आणि श्रीलंका ६० गुणांसह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत.

-० आघाडी

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतानं १-० अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतला दुसरा सामना १० ऑक्टोबरपासून पुण्यातील गहुंजे मैदानावर खेळवला जाणार आहे. त्यामुळं या सामन्यात भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेचा पराभव करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 


हेही वाचा -

बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार १५०० नव्या बस

आरेतील वृक्षतोड ताबडतोब थांबवा, सुप्रीम कोर्टाचे आदेश



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा