Advertisement

बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार १५०० नव्या बस


बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार १५०० नव्या बस
SHARES

बेस्ट बसनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण बेस्ट बसच्या प्रवासावेळी प्रवाशांना बस थांब्यावर प्रतीक्षा करावी लागू नये यासाठी बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात मार्च २०२० पर्यंत १ हजार एसी लहान बस आणि सीएनजीवर धावणाऱ्या ५०० वातानुकूलित मिडी बस दाखल करण्यात येणार आहेत. त्यासोबतच ५९० वातानुकूलित इलेक्ट्रॉनिक आणि १ हजार वातानुकूलित एकमजली बससाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची मााहिती समोर येत आहे.


आणखी बस होणार दाखल

बेस्टच्या ताफ्यात ६ मिनी एसी बस आणि इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या आहेत. मार्च २०२० पर्यंत १ हजार मिडी एसी बस आणि ५०० मिडी सीएनची एसी बस ताफ्यात दाखल होणार आहेत. नुकताच बेस्टच्या ताफ्यात दाखल झालेली मिनी एसी बस ही मुंबईच्या रस्त्यावर धावू लागली असून प्रवाशांचाही या बसला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 


ताफ्यात वाढ

या बसेससोबत आणखी ५९० इलेक्ट्रिक आणि १ हजार एसी एकमजली बससाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. सध्यस्थितीत ३५०० बस असलेला बेस्ट बसचा ताफ्यात वाढ करण्यासाठी बेस्ट प्रयत्न करत आहे.



हेही वाचा -

भिकाऱ्याच्या झोपडीत सापडली लाखोंची चिल्लर

'या' एक्स्प्रेस १० दिवसांसाठी राहणार बंद



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा