अनिल कुंबळेमुळे कुलदीप घडला - सुरेश रैना


SHARE

भारतीय संघातील उत्कृष्ठ गोलंदाजीच्या यशामागे भारताचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांचे श्रेय आहे. भारतीय संघात गोलंदाजीत सध्या कुलदीप यादव चांगली उत्कृष्ट कामगिरी करत आहे. त्याच्या या यशाचे श्रेय अनिल कुंबळेयांनाच जाते. कुलदीपला घडवण्यात अनिल कुंबळेंचे खूप मोठे योगदान आहे. असे आम्ही नाही तर भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू सुरेश रैना म्हणतो.

सध्या भारतीय संघाबहेर असलेला क्रिकेटपटू सुरेश रैना गुरुवारी मुंबई गोवा रिव्हर अनावरणाच्या कार्यक्रमात उपस्थित होता. त्यावेळी त्याने पत्रकारांशी बोलताना कुंबळे यांचे भरभरुन कोतुक केले.

रैना म्हणाला 'मी आता माझ्या खेळाचा आनंद घेत आहे. मला जेव्हा संधी मिळेल तेव्हा मी देखील भाग घेईनच. सध्या मी सराव आणि खूप मेहनत घेत आहे. ज्यावेळी मला दुखापत झाली, ती वेळ माझ्यासाठी खूप कठीण होती. नुकतेच भारतीय संघाने यो-यो ही फिटनेस चाचणी अनिवार्य केली आहे. या चाचणीत युवराज आणि अमित मिश्रा यशस्वी झाले नाहीत. पण भारतीय संघ चांगली कामगिरी करत आहे आणि संघ विजय मिळवतो, हे महत्त्वाचे आहे, याचा मला आनंद आहे. मी पुन्हा भारतीय संघात पुनरागमन करेन असा विश्वासही त्याने यावेळी व्यक्त केला.


हेही वाचा - 

म्हणून, नेहरा घेतोय क्रिकेटमधून निवृत्ती?

विराट कॅप्टन तर युवीचे कमबॅक


संबंधित विषय