Advertisement

रवी शास्त्री भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य कोच


रवी शास्त्री भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य कोच
SHARES

भारतीय संघाचा नवीन प्रशिक्षक कोण असणार यावरून गेले दोन दिवस क्रिकेट विश्वात उत्सुकता लागून राहिली होती. रवी शास्त्री यांच्या नावाची जोरदार चर्चा देखील होती. त्यामुळे दिवसभर चर्चेला उधाण आले होते. पण आता भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी रवी शास्त्रींची निवड झाली आहे. 

तर गोलंदाज प्रशिक्षक म्हणून झहीर खान याची निवड करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाची निवड करण्यासाठी माजी क्रिकेटपटूंची म्हणजेच सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर आणि व्ही. व्ही. एस लक्ष्मण अशी तीन सदस्यीय समिती नेमण्यात आली होती. 2019 च्या विश्वचषकपर्यंत रवी शास्त्री आणि झहीर खान यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


कुंबळेंनी का दिला राजीनामा?

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि आधीचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यातील मतभेदांमुळे कुंबळे यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे नुकताच झालेल्या वेस्ट इंडिज दौऱ्यादरम्यान भारतीय संघ प्रशिक्षकाशिवाय गेला होता.

भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी माजी फलंदाज विरेंद्र सेहवाग, रवी शास्त्री, अफगाणिस्थान क्रिकेट संघाचे प्रशिक्षक लालचंद राजपूत, वेस्ट इंडिजचे फिल सिमन्स, ऑस्ट्रेलियन क्रिकेटर टॉम मुडी आणि इंग्लंड क्रिकेटर रिचर्ड पायबस यांनी अर्ज केले होते.



हेही वाचा - 

मुंबईच्या प्रशिक्षकपदासाठी आमरे, दिघे यांची फिल्डींग



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा