Advertisement

विजयानंतर भारतीय संघाला बीसीसीआयकडून मिळालं 'हे' सरप्राइज गिफ्ट

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय संघाचे अभिनंदन करतानाच त्यांना एक सरप्राइज गिफ्ट दिलं आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा यांनीच याबाबत घोषणा केली आहे.

विजयानंतर भारतीय संघाला बीसीसीआयकडून मिळालं 'हे' सरप्राइज गिफ्ट
SHARES

ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध ब्रिस्बेन कसोटीत विजय मिळवल्यानंतर भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारतीय संघाने चौथ्या कसोटी सामन्यात विजय मिळवत मालिका २-१ ने जिंकली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय)  भारतीय संघाचे अभिनंदन करतानाच त्यांना एक सरप्राइज गिफ्ट दिलं आहे.  

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा यांनीच याबाबत घोषणा केली आहे. सौरव गांगुली यांनी ट्विटरवरून भारतीय संघाला विजयाबद्दल शुभेच्छा देऊन एक मोठी घोषणा केली. गांगुली यांनी म्हटलं की, हा एक उल्लेखनीय विजय आहे. ऑस्ट्रेलियात जाऊन मालिका विजय मिळवणे हे भारतीय क्रिकेटच्या इतिहासात हे कायम लक्षात ठेवले जाईल. बीसीसीआयकडून भारतीय संघाला पाच कोटींचा बोनस जाहीर करण्यात येत आहे. 

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनीही ट्विटरवरून भारतीय संघाचे कौतुक केले आहे. असे काही क्षण भारतीय क्रिकेटसाठी खूप खास असतात, असे म्हणत जय शाह यांनी बीसीसीआयकडून भारतीय संघाला पाच कोटींचा बोनस देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.हेही वाचा -

भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय, कसोटी मालिका २-१ ने जिंकलीRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा