Advertisement

भारतीय महिला खेळणार पहिलावहिला गुलाबी चेंडूतील कसोटी सामना

भारतीय महिला क्रिकेट संघ या वर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार असून त्यांचा पहिलावहिला गुलाबी चेंडूतील कसोटी सामना ३० सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीत खेळवला जाणार आहे.

भारतीय महिला खेळणार पहिलावहिला गुलाबी चेंडूतील कसोटी सामना
SHARES

भारतीय महिला क्रिकेट संघ या वर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार असून त्यांचा पहिलावहिला गुलाबी चेंडूतील कसोटी सामना ३० सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीत खेळवला जाणार आहे. पर्थ इथं अद्याप प्रकाशझोतातील एकही कसोटी सामना खेळवण्यात आला नाही. त्यामुळं भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील गुलाबी चेंडूतील कसोटी पर्थ येथेच खेळवण्यात येणार आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलिया संघटनेशी चर्चा केल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी ही घोषणा केली आहे. 'महिला क्रिकेटप्रतीची बांधिलकी जपत आम्ही भारतीय महिला संघाच्या प्रकाशझोतातील कसोटी सामन्याची घोषणा करत आहोत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध या वर्षी भारतीय महिलांचा पहिलावहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळवण्यात येईल', असं शाह यांनी स्पष्ट केलं.

भारतीय महिला संघ इंग्लंडविरुद्ध १६ जूनपासून ७ वर्षांनंतर पहिला कसोटी सामना खेळणार आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताला गुलाबी चेंडूने कसोटी सामना खेळण्याची संधी मिळणार आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ३ एकदिवसीय सामने तसंच, ३ ट्वेन्टी-२० सामने खेळणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणारा हा कसोटी सामना महिला क्रिकेटच्या इतिहासातील दुसरा प्रकाशझोतातील सामना ठरणार आहे.

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे वेळापत्रक

१९ सप्टेंबर
पहिला एकदिवसीय
नॉर्थ सिडनी ओव्हल
२२ सप्टेंबर
दुसरा एकदिवसीय
जंक्शन ओव्हल
२४ सप्टेंबर
तिसरा एकदिवसीय
जंक्शन ओव्हल
३० सप्टें- ३ ऑक्टो
प्रकाशझोतातील कसोटी
वाका मैदान
७ ऑक्टोबर
पहिला ट्वेन्टी-२०
नॉर्थ सिडनी ओव्हल
९ ऑक्टोबर
दुसरा ट्वेन्टी-२०
नॉर्थ सिडनी ओव्हल
११ ऑक्टोबर
तिसरा ट्वेन्टी-२०
नॉर्थ सिडनी ओव्हल



हेही वाचा -

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये केवळ 'इतक्या' दिवसांचा पाणीसाठा शिल्लक

Tauktae Cyclone: नौदलाचे शोधकार्य अद्याप सुरूच; २६ बेपत्ता, ४९ मृतदेह हाती


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा