Advertisement

Photo: महिला टी २० क्रिकेट संघाची सिद्धिविनायकाला ‘पृथ्वी’प्रदक्षिणा


Photo: महिला टी २० क्रिकेट संघाची सिद्धिविनायकाला ‘पृथ्वी’प्रदक्षिणा
SHARES

सर्वसामान्यांसोबतच सेलिब्रिटीजचंही श्रद्धास्थान असलेल्या प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायकाचं भारतीय महिला क्रिकेट टी २० संघाने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणातच शतक झळकावणाऱ्या पृथ्वी शाॅसोबत दर्शन घेतलं. यावेळी महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक आणि माजी फिरकीपटू रमेश पोवारही त्यांच्यासमवेत होते.


सामन्यापूर्वी दर्शन

नुकतीच पृथ्वी शाची वेस्ट इंडिजसोबत होणाऱ्या टी-२० सामन्यांसाठी तसंच आस्ट्रेलिया दौऱ्यासाठीही निवड करण्यात आली आहे. अल्पावधीतच क्रिकेट चाहत्यांचा लाडका बनलेल्या पृथ्वीसाठी वेस्ट इंडिज आणि आस्ट्रेलियातील सीरिज खूप महत्त्वाची असल्याचं मानलं जात आहे. टी-२० मालिकेत वेस्ट इंडिजचा सामना करण्यापूर्वी पृथ्वीने सिद्धिविनायकाचा आशीर्वाद घेणं पसंत केलं.


तसंच महिला क्रिकेट टी २० संघ लवकरच वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या टी २० वर्ल्डकपसाठी रवाना होणार आहे. या दौऱ्यावर जाण्यापूर्वी प्रशिक्षक रमेश पोवार यांच्यासह संघातील सदस्यांनी सिद्धिविनायकाचा आशीर्वाद घेतला. या प्रसंगी श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासचे अध्यक्ष आदेश बांदेकरही उपस्थित होते.


योग जुळून आला

सर्व क्रिकेटर्सनी मोठ्या भक्तीभावाने सिद्धिविनायकाचं दर्शन घेतल्याचं बांदेकर यांनी ‘मुंबई लाइव्ह’शी बोलताना सांगितलं. महिला क्रिकेट संघ आणि पृथ्वी वेगवेगळे दर्शनासाठी आले होते, पण दोघांच्याही दर्शनाचा एकच योग जुळून आल्याचंही बांदेकर म्हणाले. अचानक जुळून आलेल्या या योगामुळे सिद्धिविनायकाचे भक्तगण आणि क्रिकेटचे चाहते सुखावले असले तरी न्यासातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची थोडी धावपळच झाली.



हेही वाचा- 

#MeToo: जोहरी यांना निलंबित करा, ७ राज्यातील क्रिकेट मंडळांची मागणी

विराटच्या 'ओव्हरस्पीड'वर मुंबई पोलिस खूश, चलान कापणार नाही!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा