Advertisement

या २ जबरदस्त गोलंदाजांची 'मुंबई'त एन्ट्री


या २ जबरदस्त गोलंदाजांची 'मुंबई'त एन्ट्री
SHARES

न्यूझीलंड संघाचा आणि आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स संघाचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आगामी हंगामात मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणार आहे. आयसीसीच्या क्रमवारीत जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट हे अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यामुळं आता हे दोन्ही खेळाडू मुंबई इंडियन्स संघातून खेळणार आहेत. त्याशिवाय, मुंबईच्या संघात धवल कुलकर्णीची घरवापसी झाली आहे. राजस्थान संघातून ट्रेड करून धवल कुलकर्णीला मुंबई इंडियन्सचे तिकीट मिळालं आहे.

२०१४ मध्ये बोल्टने आयपीएलमध्ये पदार्पण केलं होते. त्यानंतर ३३ सामन्यात त्यानं ३८ बळी टिपले. २०१८ साली त्याला ‘दिल्ली कॅपिटल्स’ संघानं जवळपास २ कोटी २५ लाख रुपयांना खरेदी केलं होतं. दिल्लीकडून २ हंगामात खेळल्यानंतर बोल्ट आता बोल्ट IPL 2020 मध्ये मुंबईकडून खेळणार आहे.

मुंबई इंडियन्सनं याआधी विंडीजच्या शेरफेन रदरफोर्ड याला संघात समाविष्ट करून घेतलं होतं. बोल्टने २०१८ मध्ये दिल्लीसाठी १८ सामन्यात १८ विकेट्स घेतल्या. त्यानंतर IPL 2019 मध्ये त्याला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. त्या पूर्ण हंगामात त्यानं ५ सामन्यात ५ विकेट घेतल्या.



हेही वाचा - 

 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा