Advertisement

कृणाल पांड्याला मुंबई विमानतळावर अडवलं, 'हे' आहे कारण

आयपीएल जिंकून दुबईहून मुंबईत परतणाऱ्या कृणाल पांड्याला मुंबई विमानतळावर कस्टम विभागाकडून रोखण्यात आलं आहे.

कृणाल पांड्याला मुंबई विमानतळावर अडवलं, 'हे' आहे कारण
SHARES

आयपीएल जिंकून दुबईहून मुंबईत परतणाऱ्या कृणाल पांड्याला मुंबई विमानतळावर कस्टम विभागाकडून रोखण्यात आलं आहे. त्याच्याकडे प्रमाणापेक्षा जास्त सोनं आणि महागडी मनगटी घड्याळे आढळून आली आहेत. त्याची चौकशी करण्यात येत आहे.

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सने पुन्हा एकदा अंतिम सामना जिंकत पाचव्यांदा चषक पटकावला आहे. आयपीएल जिंकून मुंबई इंडियन्स संघ गुरुवारी दुबईहून भारतात परतला. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचल्यानंतर कस्टम अधिकाऱ्यांना कृणाल पांड्याकडे प्रमाणापेक्षा जास्त सोनं आणि इतर मौल्यवान वस्तू असल्याचा संशय आला.

कृणाल पांड्याकडे मिळालेल्या वस्तूंमध्ये सोन्याच्या दोन बांगड्या, महागडी घड्याळे आहेत. या वस्तूंचं कोणतंही डिक्लेरेशन कृणालकडे नसल्याने त्याला चौकशीसाठी थांबवण्यात आलं आहे.

एक वर्षाहून अधिक काळ परदेशात राहणारी व्यक्ती ५० हजारांपर्यंतचं सोनं भारतात आणू शकते. यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जात नाही. महिलांसाठी ही सूट एक लाखापर्यंत आहे. ही सूट फक्त सोन्याच्या दागिन्यांवर आहे. सोन्याचे कॉइन किंवा बिस्किट्स यासाठी शुल्क भरावं लागतं.हेही वाचा -

लसीकरणाच्या माहिती संकलनासाठी 'ॲप'

मुंबईसह राज्यातील किमान तापमानात घटRead this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा