Advertisement

मुंबई टी-२० लीगला जाणवणार दिग्गज खेळाडूंची वानवा


मुंबई टी-२० लीगला जाणवणार दिग्गज खेळाडूंची वानवा
SHARES

मुंबईची स्वतःची अशी टी-२० मुंबई लीग स्पर्धा अखेर प्रत्यक्षात साकारणार अाहे. एेतिहासिक वानखेडे स्टेडियमवर ११ ते २१ मार्चदरम्यान सहा संघांमध्ये टी-२० लीगचा थरार रंगणार अाहे. मुंबईतील जवळपास १५०० पेक्षा जास्त खेळाडूंनी या लीगसाठी अापलं नाव नोंदवलं असल्याचं मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष (एमसीए) अाशिष शेलार यांनी मान्य केलं असलं तरी स्पर्धेला दिग्गज खेळाडूंची वानवा जाणवणार अाहे. या स्पर्धेदरम्यान इराणी चषक अाणि भारताचा श्रीलंका दौरा या दोन स्पर्धा अाडव्या येत असल्याने रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, शार्दूल ठाकूर, श्रेयस अय्यर अाणि पृथ्वी शाॅ हे मुंबईचे दिग्गज फलंदाज टी-२० मुंबई लीगमध्ये खेळण्याची शक्यता धूसर अाहे.


सूर्यकुमार, पृथ्वी अायकाॅन खेळाडू

सूर्यकुमार यादव, भारताचा १९ वर्षांखालील कर्णधार पृथ्वी शाॅ, सिद्धेश लाड, अभिषेक नायर अाणि अादित्य तरे हे या स्पर्धेसाठी अायकाॅन खेळाडू ठरण्याची शक्यता अाहे. अजिंक्य रहाणे अाणि शार्दूल ठाकूर हे मुंबईचे अांतरराष्ट्रीय खेळाडू त्यांच्या उपलब्धतेनुसार या स्पर्धेत खेळणार अाहेत. अायकाॅन खेळाडूंसाठी बेस प्राइस ही ४ ते ७ कोटींच्या दरम्यान असणार अाहे.


एकाच वेळी तीन स्पर्धांचा फटका

टी-२० मुंबई लीग स्पर्धा सुरू झाल्यानंतर लगेचच भारताचा श्रीलंका दौरा (६ ते १८ मार्च) अाणि इराणी कप (१४ ते १८ मार्च) या दोन स्पर्धा सुरू होणार अाहेत. रोहित शर्मा हा भारतीय संघाचा अाधारस्तंभ अाहे. रहाणे अाणि श्रेयस अय्यर हे भारताच्या टी-२० संघाचा भाग नसले तरी रहाणेने अलिकडे विजय हजारे ट्राॅफीसाठी मुंबई संघातून विश्रांती घेतली होती. रणजी करंडकातील सुरेख कामगिरीमुळे पृथ्वी शाॅची इराणी चषकासाठी निवड होऊ शकते. त्यामुळे एमसीएच्या पहिल्यावहिल्या टी-२० मुंबई लीगला मात्र दिग्गज खेळाडूंची वानवा जाणवणार, हे मात्र निश्चित.


हेही वाचा - 

सचिन तेंडुलकरची टी-२० मुंबई लीगच्या ब्रँड अॅम्बेसेडरपदी निवड

एमसीएच्या मुंबई टी-२० लीगचा पुन्हा फियास्को? दुसऱ्यांदा मागवल्या संघांसाठी निविदा



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा