Advertisement

आयपीएलचं १३वं सत्र भारतातच खेळविण्याची वकिलाची मागणी

यंदाची आयपीएल ही भारताबाहेर म्हणजे संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) खेळविण्यात येणार आहे.

आयपीएलचं १३वं सत्र भारतातच खेळविण्याची वकिलाची मागणी
SHARES

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्रिकेट विश्वाला मोठा फटका बसला आहे. वर्षाच्या सुरूवातीला आयोजित करण्यात आलेले अनेक सामने रद्द करण्यात आले असून काहींना स्थगिती देण्यात आली. अशातच जगभरात प्रसिद्ध असलेली इंडियन प्रिमीयर लीगला (आयपीएल) पुढे ढकलण्यात आली होती. आयपीएल होणार की नाही? याबाबत शंका निर्माण झाली होती. परंतु, यंदाची आयपीएल ही भारताबाहेर म्हणजे संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) खेळविण्यात येणार आहे. त्यामुळं यंदाही आयपीएलचे सामने पाहायला मिळणार असल्यानं चांहत्यांमध्ये उत्साहाच वातावरण निर्माण झालं आहे. इंडियन प्रीमियर लीगचे १३ वे सत्र संयुक्त अरब अमिराती (यूएई) मध्ये भरवण्याच्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निर्णयाला एका वकिलाने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

केंद्र सरकारनं वेळोवेळी लॉकडाऊनचे नियम शिथिल करीत मॉल, हॉटेल, पार्क सुरू करण्याची परवानगी दिली. त्यामुळं आयपीएलचे सामनेही सर्व आवश्यक ती काळजी घेऊन खेळले जाऊ शकतात. त्यामुळं बीसीसीआयला देशातच सामने भरविण्याचे निर्देश द्यावे, अशी मागणी याचिकादारांनी केली आहे. देशाबाहेर आयपीएलचे सामने भरविण्यात आले तर देशाला फार मोठा आर्थिक फटका बसेल, असं या याचिकेत म्हटले आहे.

२०१९ मध्ये आयपीएलची ब्रँड व्हॅल्यू ४७५ अब्ज रुपये होती. बीसीसीआयच्या उत्पन्नाचं हे मुख्य स्रोत आहे. या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे आयपीएलचे सामने पुढे ढकलण्यात आले. बीसीसीआयनं २ ऑगस्ट रोजी निर्णय घेतला असून, १९ सप्टेंबर आणि १० नोव्हेंबरच्या कालावधीत दुबईच्या शारजाह आणि अबुधाबीच्या स्टेडियममध्ये हे सामने भरविण्यात येणार आहेत. हेही वाचा -

IPL 2020 : आयपीएलसाठी रोहित शर्माचा जोरदार सराव

धोनीपाठोपाठ सुरेश रैनाने केली निवृत्तीची घोषणासंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा