Advertisement

कोहलीची महान खेळाडूच्या दिशेने वाटचाल – धोनी


कोहलीची महान खेळाडूच्या दिशेने वाटचाल – धोनी
SHARES

एक युवा खेळाडू ते भारतीय संघाचा अाधारस्तंभ हे विराट कोहलीचं स्थित्यंतर मी जवळून अनुभवलं अाहे. भारताचा हा कर्णधार अाता महान खेळाडूच्या दिशेनं वाटचाल करत अाहे. गेल्या काही वर्षात त्याने अापली गुणवत्ता, कर्तृत्व सिद्ध केलं अाहे, अशा शब्दांत भारताचा वर्ल्डकप विजेता कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं विराट कोहलीवर स्तुतीसुमनं उधळली अाहेत.

कोहली हा सध्याचा सर्वोत्तम फलंदाज असून त्याने अापला स्वत:चा दर्जा निर्माण केला अाहे. अाता तर तो महान खेळाडू होण्याच्या वाटेवर अाहे. कोणत्याही देशात, कोणत्याही खेळपट्टीवर कोहली ज्याप्रमाणे फलंदाजी करत अाहे, त्याप्रमाणेच त्याच्यातील अस्सल गुणवत्ता सर्वांसमोर येत अाहे, असे धोनीने मंगळवारी मुंबईत झालेल्या एका पत्रकार परिषदेत सांगितले.


कर्णधाराकडून हेच अपेक्षित

कोहली ज्याप्रमाणे अापल्या संघाला पुढे घेऊन जात अाहे, एका कर्णधाराकडून तेच अपेक्षित असते. कोहलीला पुढील कामगिरीसाठी माझ्याकडून शुभेच्छा. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघ नक्कीच चांगली कामगिरी करेल, असा मला विश्वास अाहे. कसोटी सामना जिंकण्यासाठी प्रतिस्पर्ध्याचे २० विकेट्स टिपणे अावश्यक असते. मला वाटतं, भारतीय संघानं पहिल्या कसोटीत ही लढाई जिंकली होती, असंही धोनीनं सांगितलं.


२०१९चा वर्ल्डकप खेळणार

महेंद्रसिंग धोनीनं अापल्या निवृत्तीबाबतच्या चर्चेला यावेळी पूर्णविराम दिला. “अनेक जण माझ्या निवृत्तीविषयी अफवा पसरवत अाहेत. पण मी अाताच २०१९ च्या वर्ल्डकपची तयारी सुरू केली अाहे. इंग्लंडमध्ये चेंडूला रिव्हर्स-स्विंग मिळणार अाहे, त्याचा फायदा भारतीय संघाला कसा होईल, याचा अभ्यास मी करत अाहे,” असंही धोनीनं सांगितलं.


हेही वाचा -

गॅरी कर्स्टन घेणार मुंबईतील प्रतिभावान क्रिकेटपटूंचा शोध

अखेर एमसीएने दिला 'त्या’ खेळाडूंना न्याय



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा