Advertisement

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी मुंबईकर श्रेयसची निवड


न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी मुंबईकर श्रेयसची निवड
SHARES

नोव्हेंबरमध्ये सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी सोमवारी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. विशेष म्हणजे यात मुंबईकर श्रेयस आय्यरला संधी देण्यात आली आहे. याचसोबत हैदराबादचा गोलंदाज मोहमद सिराज याची देखील या मालिकेत वर्णी लागली आहे.

काही दिवसांपूर्वी आशिष नेहराने आपण क्रिकेट कारकिर्दीत निवृत्ती घेणार असल्याचे सांगितले होते. या टी-20 सामन्यासाठी नेहराचीही निवड करण्यात आली आहे. तो या मालिकेतील फक्त पहिल्या सामन्यात खेळणार असून त्यानंतर तो निवृत्ती घेणार आहे, अशी माहिती मुंबईत सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेतून देण्यात आली.

मायदेशात होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. या टी-20 मालिकेत 3 सामने होणार आहेत. यामध्ये मुंबईच्या श्रेयस अय्यरला स्थान दिल्यामुळे नक्कीच मुंबकरांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे. आतापर्यंत अय्यरने प्रथम श्रेणी, टी 20 आणि वन डे मध्ये शानदार कामगिरी केली आहे. यामुळे त्याची निवड करण्यात आली असल्याचे निवड समितीचे प्रमुख एम. एस. के. प्रसाद यांनी सांगितले.

या मालिकेसाठी विराट कोहलीला विश्रांती देण्याची चर्चा मध्यंतरी सुरू होती. पण याला सध्या पूर्ण विराम मिळाला आहे. कारण न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी कर्णधारपदाची धुरा ही विराटकडे सोपवण्यात आली आहे. हे सामने 1 नोव्हेंबरपासून दिल्लीत, 4 नोव्हेंबरला राजकोट आणि 7 नोव्हेंबर ला तिरूअनंतपुरम या ठिकाणी खेळवण्यात येतील.


न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी या खेळाडूंची निवड

कर्णधार विराट कोहली, उप कर्णधार रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, शिखर धवन, महेंद्र सिंह धोनी, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, यजुवेंद्र चाहल, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, आशिष नेहरा.



हेही वाचा - 

न्यूझलंडविरुद्धच्या सामन्यात भारताला पराभवाचा धक्का


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा