Advertisement

न्यूझलंडविरुद्धच्या सामन्यात भारताला पराभवाचा धक्का


न्यूझलंडविरुद्धच्या सामन्यात भारताला पराभवाचा धक्का
SHARES

रविवारी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. नाणेफेक जिंकत भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने 50 ओव्हरमध्ये 8 बाद 280 धावा केल्या. महत्त्वाचे म्हणजे हा सामना  विराट कोहलीचा 200 वा आंतरराष्ट्री सामना होता. ज्यामध्ये विराटने आपला शतक पूर्ण केला. पण विराट व्यतिरिक्त इतर कोणत्याही खेळाडूंना चांगल्या धावा करता आल्या नाही. त्यामुळे अवघ्या 49 व्या षटकात न्यूझीलंडने भारतावर ६ गडी राखून मात केली. हा विजय मिळवत न्यूझीलंडने 1-0 ने आघाडी घेतली आहे.

भारताचे 280 धावांचे आव्हान स्वीकारत न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टील याने चांगली सुरुवात केली. पण हार्दिक पंड्या, कुलदीप यादव यांच्या गोलंदाजासमोर गुप्टील केन विल्यम्सन, मुन्रो यांना जास्तकाळ टिकता आले नाही. पण टेलर आणि लॅथम यांनी 200 धावांची भागीदारी करत संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची कामगिरी केली.

पहिल्या सामन्यात भारताचा पराभव झाला असला तरी कोहलीने झळकवलेल्या शानदार शतकाची चर्चा मात्र चांगली सुरू आहे. या सामन्यात कोहलीने 125 चेंडूत 121 धावा केल्या. ज्यामध्ये त्याने 9 चौकार आणि 2 षटकार लगावले. कोहलीने आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीत 31 शतक केले आहे.


भारतीय संघ धावफलक

शिखर धवन (९), रोहित शर्मा (२०), विराट कोहली (121) दिनेश कार्तिक (३७), केदार जाधव (१२), महेंद्रसिंह धोनी (२५), हार्दिक पंड्या (१६) आणि भुवनेश्वर कुमार नाबाद (२६)


न्यूझीलंड संघ धावफलक

मार्टिन गुप्टील (३२), रॉस टेलर (९५), कोलीन मुनरो (२८), टॉम लेथम नाबाद (१०३)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा