Advertisement

पहिल्या रणजी सामन्यात अादित्य तरेची अनुपस्थिती


पहिल्या रणजी सामन्यात अादित्य तरेची अनुपस्थिती
SHARES

शनिवारपासून सुरु झालेल्या सलामीच्या सामन्यात मुंबई संघाला कर्णधार अादित्य तरेविनाच खेळावे लागत आहे. वैयक्तिक कारणामुळे अदित्य पहिल्या सामन्यात गैरहजर असून अादित्यच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादवकडे मुंबईची धुरा सोपवण्यात आली आहे. याआधीही सूर्यकुमारने मुंबईचं नेतृत्त्व केलं आहे. त्याच्या अनुभवाचा नक्कीच मुंबईला फायदा होईल. मुंबई विरुद्ध मध्य प्रदेशममधील पहिला सामना इंदूरमध्ये खेळवला जात आहे.   

रणजी स्पर्धेत मुंबई संघाला स्टार खेळाडूंची कमतरताही जाणवत आहे. श्रेयस अय्यर, धवल कुलकर्णी, तुषार देशपांडे, पृथ्वी शॉ, शार्दुल ठाकूर, बलविंदर संधू हे स्टार खेळाडू सध्या भारत अ आणि अध्यक्षीय संघाकडून खेळत असल्याने ते यंदाच्या रणजी सामन्यात खेळू शकणार नाहीत.

भारतीय संघाचा सलमावीर अजिंक्य रहाणे रणजी स्पर्धेत खेळेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. पण अजिंक्यने देखील रणजी खेळण्यास नकार दिला होता. यामुळे आता मुंबई संघाची धुरा तरुण आणि अनुभवी खेळाडूंवर जास्त असेल.


मुंबई संघ

सूर्यकुमार यादव (कर्णधार), जय बिस्त, आदित्य धुमाळ, रॉयस्टर डायस, विजय गोहिल, अखिल हेरवाडकर, एकनाथ केरकर, सिध्देश लाड, शिवम मल्होत्रा, मिनाद मांजरेकर, अभिषेक नायर, आकाश पारकर, शुभम रांजणे आणि सुफियान शेख.


मध्य प्रदेश संघ  

देवेंद्र बुंदेला (कर्णधार), हरप्रीत सिंग, अंकित शर्मा, अवेश खान, अंकित दाने, पुनीत दाते, मिहिर हिरवाणी, सारांश जैन, नमन ओझा, ईश्वर पांड्ये, रजत पाटीदार, चंद्रकांत सकुरे, शुभम शर्मा, आदित्य श्रीवास्तव, अंशुल त्रिपाठी आणि वसीम अहमद.


हेही वाचा - 

रणजी उपांत्य लढतीसाठी मुंबई संघाची निवड



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा