Advertisement

शार्दूल ठाकूर दुखापतीमुळे आॅस्ट्रेलिया दौऱ्याला मुकणार

शार्दूल आगामी आॅस्ट्रेलिया दौऱ्याला मुकणार आहे. असं असलं तरी दुखापतीतून सावरत आपण पुन्हा एकदा भारतीय संघात परतू, असा विश्वास शार्दूलने व्यक्त केला आहे.

शार्दूल ठाकूर दुखापतीमुळे आॅस्ट्रेलिया दौऱ्याला मुकणार
SHARES

मुंबईकर तेज गोलंदाज शार्दूल ठाकूर याला दुखापतीमुळे पुढील ५० दिवस क्रिकेटपासून दूर राहण्याचा सल्ला डाॅक्टरांनी दिला आहे. त्यामुळे शार्दूल आगामी आॅस्ट्रेलिया दौऱ्याला मुकणार आहे. असं असलं तरी दुखापतीतून सावरत आपण पुन्हा एकदा भारतीय संघात परतू, असा विश्वास शार्दूलने व्यक्त केला आहे.


सातत्याने दुखापत

शार्दूलला वेस्ट इंडिजविरूद्धच्या कसोटी मालिकेत पदार्पणाची संधी मिळाली होती. मात्र दुसऱ्या कसोटीत केवळ १० चेंडू टाकून त्याला दुखापतीमुळे तंबूत परतावं लागलं होतं. त्याआधीही आशिया कपमध्ये हाँगकाँगविरूद्धचा सामना त्याला अर्धवट सोडावा लागला होता. दुखापतीमुळे शार्दूल २ आंतरराष्ट्रीय सामन्यांना मुकला.


७ ते ८ आठवडे क्रिकेटपासून दूर

डाॅक्टरांनी त्याला पुढील ७ ते ८ आठवडे क्रिकेटपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. याच काळात भारतीय संघ आॅस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जात असून तिथं ३ टी २०, ३ वन डे आणि ४ कसोटी सामने खेळणार आहे. यापैकी टी २० मालिका आणि पहिल्या २ कसोटीसाठी शार्दूल भारतीय संघासाठी उपलब्ध नसेल.

''मी कितीही मेहनत घेतली तरी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याआधी मी पूर्णपणे फिट होऊ शकणार नाही. म्हणूनच मी वन डे मालिकेत पुनरागमन करण्याचं ध्येय समोर ठेवलं आहे.'' असा विश्वास शार्दूलने व्यक्त केला आहे.



हेही वाचा-

द. आफ्रिकेचा डी काॅक खेळणार मुंबई इंडियन्सकडून

सचिन, विनोदची जोडी खेळणार नवी इनिंग!



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा