Advertisement

द. आफ्रिकेचा डी काॅक खेळणार मुंबई इंडियन्सकडून

डिसेंबर महिन्यात होणाऱ्या खेळाडूंच्या लिलावाआधीच मुंबई इंडियन्सने डी काॅकला 'ट्रेड विंडो'च्या माध्यमातून खरेदी केलं आहे. बंगळुरूने डी काॅकला २.८ कोटी रुपयांना खरेदी केलं होतं. याच किंमतीमध्ये बंगळुरूने डी काॅकला मुंबई इंडियन्सला विकलं आहे.

द. आफ्रिकेचा डी काॅक खेळणार मुंबई इंडियन्सकडून
SHARES

दक्षिण आफ्रिकेचा विकेटकिपर बॅट्समन क्विंटन डी काॅक इंडियन प्रीमियर लिग (आयपीएल)च्या १२ व्या सीझनमध्ये आता मुंबई इंडियनकडून खेळणार आहे. डी काॅक मागच्या सीझनमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू या टीमकडून खेळला होता.

'ट्रेड विंडो'चा वापर

डिसेंबर महिन्यात होणाऱ्या खेळाडूंच्या लिलावाआधीच मुंबई इंडियन्सने डी काॅकला 'ट्रेड विंडो'च्या माध्यमातून खरेदी केलं आहे. बंगळुरूने डी काॅकला २.८ कोटी रुपयांना खरेदी केलं होतं. याच किंमतीमध्ये बंगळुरूने डी काॅकला मुंबई इंडियन्सला विकलं आहे.

डी काॅकला खरेदी करण्यासाठी मुंबईने फास्ट बाॅलर मुस्तफिजूर रेहमान (२.२ कोटी) आणि श्रीलंकाचा आॅफ स्पिनर अकिला धनंजया (५० लाख) यांना सोडलं आहे.

डी काॅकने आयपीएलच्या ११ व्या सीझनमध्ये ८ मॅचमध्ये १२४.०७ च्या स्ट्राइक रेटने २०१ रन्स बनवले होते. २०१३ पासून डी काॅकने आतापर्यंत २४ मॅच खेळल्या आहेत. मुंबईच्या टीममध्ये सद्यस्थितीत आदित्य तरे आणि इशान किशन यांच्या रुपाने २ विकेटकिपर बॅट्समन आहेत.

हेही वाचा-

सचिन, विनोदची जोडी खेळणार नवी इनिंग!

१० विकेट राखून मुंबईचा विजय, अर्जुनच्या गोलंदाजीसमोर प्रतिस्पर्धी हतबल

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा