Advertisement

अाविष्कार साळवीची पुद्दुचेरीच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती


अाविष्कार साळवीची पुद्दुचेरीच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती
SHARES

भारताचा अाणि मुंबईचा वेगवान गोलंदाज अाविष्कार साळवी याची पुद्दुचेरी रणजी संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात अाली अाहे. भारताची राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा समजल्या जाणाऱ्या रणजी करंडक स्पर्धेत यावर्षीपासून पुद्दुचेरी संघ पहिल्यांदाच प्रतिनिधित्व करणार अाहे. ३६ वर्षीय अाविष्कार साळवीने चार वनडे सामन्यांत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केल अाहे. त्याचबरोबर ६२ प्रथम श्रेणी सामन्यांत त्याने १६९ विकेट्स अापल्या नावावर केल्या अाहेत.


अाविष्कार साळवी याच्याकडे क्रिकेटचे अफाट ज्ञान असून वैयक्तिकपणे मी त्याला अनेक वर्षांपासून अोळखत अाहे. मुंबईला रणजी करंडक जिंकून देण्यात त्याने मोलाचा वाटा उचलला अाहे. मुंबईचा खडूसपणा त्याच्यात ठासून भरलेला अाहे. त्यामुळे मुंबईची क्रिकेट संस्कृती पुद्दुचेरीमध्ये अाणण्यासाठी मी उत्सुक अाहे.
- पी. दामोदरन, पुद्दुचेरी क्रिकेट असोसिएशनचे सचिव

पुद्दुचेरीचे मुंबई कनेक्शन

अाविष्कार साळवीसह मुंबईचे अनेक अाजी-माजी खेळाडू नव्याने स्थापन झालेल्या पुद्दुचेरी संघात समाविष्ट झाले अाहेत. अष्टपैलू क्रिकेटपटू अभिषेक नायर हा अनुभवी खेळाडू पुद्दुचेरीकडून खेळणार अाहे. त्याचबरोबर अष्टपैलू खेळाडू अोंकार खानविलकर हा सहप्रशिक्षकाच्या तर प्रवीण तांबे हा २३ वर्षांखालील संघाच्या प्रशिक्षकपदाच्या भूमिकेत दिसणार अाहे.


हेही वाचा -

पृथ्वी शाॅची भारतीय कसोटी संघात निवड

मुंबईकर अभिषेक नायर पुद्दुचेरीकडून खेळणार



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा