Advertisement

मुंबई इंडियन्स, दिल्ली डेअरडेव्हिल्सला पहिल्या विजयाची प्रतीक्षा


मुंबई इंडियन्स, दिल्ली डेअरडेव्हिल्सला पहिल्या विजयाची प्रतीक्षा
SHARES

गतविजेता मुंबई इंडियन्स अाणि दिल्ली डेअरडेव्हिल्स यांना यंदाच्या अायपीएलमध्ये अद्यापही विजयाचे खाते खोलता अाले नाही. मात्र वानखेडे स्टेडियमवर शनिवारी होणारा सामना हा दोन्हीपैकी एका संघाला विजयपथावर नेणारा ठरणार अाहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स घरच्या मैदानाचा फायदा उठवण्यासाठी सज्ज झाला अाहे. मयांक मार्कंडे दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या फलंदाजांवर भारी पडतो का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार अाहे.


हार्दिक पंड्या खेळणार का?

गुडघ्याच्या दुखापतीमुळे हार्दिक पंड्याला दुसऱ्या सामन्यात खेळता अाले नव्हते. मात्र त्याच्या जागी तोडीचा खेळाडू मुंबई इंडियन्सला निवडता अाला नाही. त्याच्या जागी संधी मिळालेला बेन कटिंग सर्व अाघाड्यांवर फ्लाॅप ठरला. त्यामुळे अाता हार्दिक पंड्या दुखापतीतून सावरून मैदानावर उतरतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले अाहे.


रोहित शर्माकडून हवंय योगदान

मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा फलंदाजीत अातापर्यंत पूर्णपणे फ्लाॅप ठरला अाहे. रोहित शर्मा अाणि इर्विन लुइस यांना अातापर्यंत सूर गवसलेला नाही. रोहित शर्माने अातापर्यंत ११ अाणि १५ धावा फटकावल्या अाहेत. त्याचबरोबर किराॅन पोलार्डकडूनही मुंबईला मोठ्या फटकेबाजीची अपेक्षा अाहे.


दिल्लीचं नशीब रुसलं

राजस्थान राॅयल्सविरुद्धच्या गेल्या सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या विजयाच्या अाशेवर पावसानं पाणी फेरलं. ट्रेंट बोल्ट अाणि शाहबाझ नदीम यांनी गोलंदाजीत चमकदार कामगिरी केली असून मोहम्मद शमीही छाप पाडत अाहे. फलंदाजीत मात्र गौतम गंभीर अाणि ग्लेन मॅक्सवेल यांच्यावर दिल्ली डेअरडेव्हिल्सची भिस्त असणार अाहे.

सामना : मुंबई इंडियन्स वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स
ठिकाण : वानखेडे स्टेडियम, मुंबई
वेळ : दुपारी ४ वाजल्यापासून


हेही वाचा -

मुंबई इंडियन्सला धक्का, पॅट कमिन्सची माघार

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा