IND vs WI: पहिला टी-२० सामना वानखेडे स्टेडियममध्ये होणार?

बांगलादेश मालिकेनंतर वेस्ट इंडिजचा संघ भारतात ३ वन डे आणि ३ टी-२० मालिका खेळण्यासाठी येणार आहे.

SHARE

बांगलादेश मालिकेनंतर वेस्ट इंडिजचा संघ भारतात ३ वन डे आणि ३ टी-२० मालिका खेळण्यासाठी येणार आहे. या दौऱ्याला ६ डिसेंबर पासून टी-२० सामन्यानं सुरुवात होणार आहे. पहिला ट्वेंटी-२० सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. पण, मुंबई पोलिसांनी या सामन्याला सुरक्षा पुरवण्यास अडचण होईल, असं सांगितले आहे.

महापरिनिर्वाण दिन

६ डिसेंबर हा महापरिनिर्वाण दिन आहे आणि त्यामुळे मुंबईतील बहुतेक पोलीस त्या ड्युटीवर असणार आहे. त्यामुळे क्रिकेट सामन्याला सुरक्षा पुरवण्या इतके पोलीस मुंबई पोलिसांकडे उपलब्ध नसल्याचं बोललं जात आहे. मुंबई पोलिसांनी क्रिकेट सामन्याला सुरक्षा पुरवण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याचं मुंबई क्रिकेट असोसिएशनला सांगितलं आहे. त्याशिवाय अयोध्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालानंतर ६ डिसेंबरला तणाव निर्माण होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. त्यात महापरिनिर्वाण दिवस असल्यानं पोलिसांवर प्रचंड ताण असणार आहे.

वस्तुस्थितीची कल्पना

मुंबई पोलिसांच्या प्रतिनिधिंनी मुंबई क्रिकेट असोसिएशनला वस्तुस्थितीची कल्पना दिली. याबाबत मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अधिकारी पोलीस आयुक्त संजय बर्वे यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर हा सामना होईल की नाही, हे स्पष्ट होणार असल्याची माहिती मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यानं दिली.

अंतिम सामना

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातला दुसरा कसोटी सामना शुक्रवारपासून सुरू होत आहे. कोलकाताच्या इडन गार्डनवर डे नाइट कसोटी होणार आहे आणि त्यासाठी दोन्ही संघ कसून सराव करत आहेत. या मालिकेतील हा अखेरचा सामना असणार आहे.

टी-२० मालिका

६ डिसेंबर - मुंबई
८ डिसेंबर - तिरुवनंतपुरम
११ डिसेंबर - हैदराबाद

वन डे मालिका

१५ डिसेंबर- चेन्नई
१८ डिसेंबर- विशाखापट्टणम
२२ डिसेंबर - कट्टकहेही वाचा -

उच्च न्यायालयानं मुंबई महापालिकेला 'या' कारणामुळं फटकारलं

महापालिकेच्या रुग्णालयात सीईओची नेमणूकसंबंधित विषय
ताज्या बातम्या