Advertisement

महापालिकेच्या रुग्णालयात सीईओची नेमणूक

महापालिकेनं रुग्णालयात मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) नेमण्याचा निर्णय घेतला आहे.

महापालिकेच्या रुग्णालयात सीईओची नेमणूक
SHARES

केईएम रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे हात गमवावा लागलेल्या प्रिन्स राजभर या ३ महिन्याच्या मुलाला १० लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे. याबाबत महापालिकेच्या गटनेत्यांची बैठक झाली असून, या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. प्रिन्सला देण्यात येणार १० लाख रुपयांमधील ५ लाख रुपये त्याच्या नावावर मुदत ठेवीवर ठेवण्यात येणार आहेत. तसंच, उर्वरित ५ लाख रुपये त्याच्या पालकांना उदरनिर्वाहासाठी देण्यात येणार आहेत. दरम्यान, या घटनेनंतर महापालिकेनं रुग्णालयात मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) नेमण्याचा निर्णय घेतला आहे.

सीईओची नेमणूक

महापालिकेच्या रुग्णालयांतील कारभारात समन्वय आणि सुसूत्रता आणण्यासाठी महापालिकेनं केईएम, कूपर, नायर आणि शीव या ४ रुग्णालयात मुख्य कार्यकारी अधिकारी नेमून त्यांचा कारभार पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांच्या हाती देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, पालिकेच्या या निर्णयाला शिवसेनेसह सर्वपक्षीयांनी गटनेत्यांच्या बैठकीत जोरदार विरोध केला. तसंच, सीईओंच्या जागी पालिकेनं रुग्णालयाच्या माजी उप अधिष्ठात्यांची नेमणूक करावी, अशा सूचनाही करण्यात आल्या. या सुचनेला पालिका आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

हेही वाचा - औषधे मिळणार ४० टक्के सवलतीच्या दरात

सीईओची नियुक्ती

त्यानुसार, मंगळवारी महापालिका आयुक्त प्रविण परदेशी यांनी केईएम, कूपर, नायर आणि शीव या ४ रुग्णालयात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. तसंच, सर्व मुख्य रुग्णालयांमध्ये देखील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.

महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये ३ वॉर्ड अधिकाऱ्यांना अंतरिम प्रशासकाच्या अंतर्गत नियुक्त केलं आहे. हे मुख्य कार्यकारी अधिकारी रुग्णालयाच्या अधिष्ठाता यांना सर्व माहिती देणार आहेत. जी उत्तर वॉर्डचे सहाय्यक नगरपालिका आयुक्त किरण दीघावकर यांना सायन रुग्णालयाच्या देखभालीची जबाबदारी देण्यात आली आहे. जी पूर्व वार्डचे सहायक आयुक्त प्रशांत नगरपाल यांना कूपर रुग्णालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. पी दक्षिण वॉर्डचे सहायक आयुक्त देवीदास क्षीरसागर यांना नाय रुग्णालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.



हेही वाचा -

‘सेक्युलर’ शब्द घटनेतच, शिवसेनेला कुणीही शिकवू नये- राऊत

आघाडीच्या नेत्यांची उद्धव ठाकरेंशी चर्चा- संजय राऊत



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा