Advertisement

ट्विटरमुळे हैराण झाला सचिन!


ट्विटरमुळे हैराण झाला सचिन!
SHARES

क्रिकेटचा देव समजला जाणारा सचिन तेंडुलकरला ट्विटरने हैराण करून सोडलंय. आता तुम्हाला वाटले असेल त्याला जास्त ट्विट येत असल्याने तो हैराण झाला की काय? पण असे काहीच नाही. खरेतर तो ट्विटरवरच्या फेक अकाऊंटमुळे त्रस्त झालाय. होय सचिनच्या मुलांचे फेक अकाऊंट बनवण्यात आहेत. हे अकाऊंट बंद करण्याची विनवणी त्याने ट्विटरवरून केली आहे.



सचिन स्वत: सोशल मीडियाचा चाहता आहे. पण सध्या ट्विटरवरून सारा आणि अर्जुन तेंडुलकर यांच्या नावाने फेक अकाऊंट बनवण्यात आले आहे. ज्यामुळे सचिन तेंडुलकर चिंतीत आहे. त्याने ट्विटरवर हे फेक अकाऊंट बंद करण्यास सांगितले आहे. सचिन म्हणतो माझ्या दोन्ही मुलांचे सारा आणि अर्जुन यांच्या नावाचे एकही अकाऊंट सोशल मीडियावर बनवण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांच्या नावाने जे फेक अकाऊंट बनवले गेलेत ते कृपया बंद करावे.

काही दिवसांपूर्वी सारा तेंडुलकच्या फेक अकाऊंटवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल अपशब्द ट्विट करण्यात आले होते. त्यामुळे मोठा वाद झाला होता.



हेही वाचा - 

ऐका काय म्हणतोय मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर?



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा