SHARE

फिफा अंडर-१७ विश्वचषक ही आपल्या देशासाठी एक मोठी संधी आहे. ही स्पर्धा भारतात आयोजित करण्यात आली आहे. यात आपला संघ किती मजबूत आहे, ही दाखवण्याची आता खरी वेळ आली आहे. नक्कीच भारतीय संघ हा यशस्वी होईल. हे उद्गार आहेत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचे.

सचिन तेंडुलकर याने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून भारतीय फुटबॉल खेळाडूंसाठी शुभेच्छा व्हिडिओ पोस्ट करत संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.गेल्या अनेक दिवसांपासून फिफा अंडर-१७ या फुटबॉलच्या विश्वचषक स्पर्धेची सर्वांनाच उत्सुकता लागून आहे. ही स्पर्धा भारतात पहिल्यांदाच खेळवली जाणार आहे. यानिमित्ताने सरकारने तसेच आयोजकांतर्फे उत्कृष्ट अशी व्यवस्था देखील करण्यात आली आहे. या स्पर्धेमुळे देशातील फुटबॉल खेळाडूंना तसेच फुटबॉल खेळांमध्ये प्रगती होईल आणि त्याचे प्रबोधन होणार आहे.

या फुटबॉल स्पर्धेसाठी संघाचा सराव तसेच विश्वचषकावर नाव कोरण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे.


हेही वाचा - 

सचिन तेंडुलकर आणि रोहीत शर्माने केलं कुलदीपचं कौतुक

सचिन तेंडुलकरचा फिटनेस फंडा!


संबंधित विषय
ताज्या बातम्या