Advertisement

पारसी जिमखान्याने पटकावले नवाब सालार जंग स्पर्धेचे जेतेपद


पारसी जिमखान्याने पटकावले नवाब सालार जंग स्पर्धेचे जेतेपद
SHARES

अमन खान (७१) याची शानदार फलंदाजी अाणि रौनक शर्मा याचा अष्टपैलू खेळ (३५ धावा अाणि ३ विकेट्स) या कामगिरीच्या बळावर गतविजेत्या पारसी जिमखान्याने पय्याडे क्रिकेट क्लबचा ६५ धावांनी पराभव करत ६९व्या नवाब सालार जंग टी-२० क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद पटकावले. एमसीएच्या मान्यतेने इस्लाम जिमखान्यावर रंगलेल्या या स्पर्धेत पारसी जिमखान्याने ६ बाद २०९ धावा उभारल्या. हे अाव्हान पेलताना पय्याडेला ९ बाद १४४ धावांपर्यंतच मजल मारता अाली. अमन खानला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात अाले.


अमन खानने रचला विजयाचा पाया

सलामीवीर अारक्षित गोमेल (७) झटपट माघारी परतल्यानंतर अमन खानने पारसी जिमखान्याच्या डावाची पायाभरणी केली. त्याने ४१ चेंडूंत सहा चौकार अाणि तीन षटकारांनिशी ७१ धावांची खेळी साकारली. त्याने रौनक शर्माच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी ६७ धावांची तर कैझर दाफेदारसह चौथ्या विकेटसाठी ३१ धावांची भागीदारी रचली. त्यामुळे पारसी जिमखान्याला दोनशे धावांचा टप्पा अोलांडता अाला.


पय्याडेच्या फलंदाजांकडून निराशा

प्रत्युत्तरादाखल पय्याडे क्रिकेट क्लबच्या फलंदाजांनी सपेशल निराशा केली. लेगस्पिनर रौनक शर्मा अाणि अाॅफस्पिनर पुनीत त्रिपाठी यांच्या फिरकी गोलंदाजीसमोर पय्याडेच्या एकाही फलंदाजाला मैदानावर तग धरता अाला नाही. डावखुरा पराग खानापूरकर (३७) अाणि बद्रे अालम (२२) वगळता पय्याडेच्या सर्व फलंदाजांना मोठी खेळी करण्यात अपयश अाले. रौनकने तीन तर पुनीत त्रिपाठीने दोन विकेट्स मिळवत पारसी जिमखान्याच्या विजेतेपपदावर सलग दुसऱ्यांदा मोहोर उमटवली.


हेही वाचा -

बद्रे अालमच्या दमदार गोलंदाजीमुळे पय्याडे अंतिम फेरीत

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा