Advertisement

टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी पुन्हा रवी शास्त्री

न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू माइस हेसन, ऑस्ट्रेलियाचे माजी अष्टपैलू टॉम मूडी, लालचंद राजपूत, मुंबई इंडियन्सचे माजी प्रशिक्षक रॉबिन सिंग, वेस्ट इंडिजचे फिल सिमन्स टीम इंडियाचे प्रशिक्षक बनण्यास इच्छुक होते.

टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी पुन्हा रवी शास्त्री
SHARES

भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी पुन्हा एकदा रवी शास्त्री यांची निवड झाली आहे. कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांच्या समितीने रवी शास्त्री यांना दुसऱ्यांदा या पदावर संधी दिली आहे. टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी ६ जण दावेदार होते. मात्र, रवी शास्त्री यांनी बाजी मारली. कर्णधार विराट कोहलीने शास्त्री यांच्या बाजूने आपला कौल दिला होता.

न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू व आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचे माजी प्रशिक्षक माइस हेसन, ऑस्ट्रेलियाचे माजी अष्टपैलू टॉम मूडी, लालचंद राजपूत, मुंबई इंडियन्सचे माजी प्रशिक्षक रॉबिन सिंग, वेस्ट इंडिजचे फिल सिमन्स टीम इंडियाचे प्रशिक्षक बनण्यास इच्छुक होते. या सहा जणांनीही या पदासाठी अर्ज केले होते. शास्त्री भारतीय संघासोबत वेस्ट इंडिज दौऱ्यावर असल्यामुळे त्यांची मुलाखत व्हिडीओ कॉन्फरन्सने घेण्यात आली. त्यांनी सर्वात शेवटी मुलाखत दिली. तर मुलाखतीपूर्वीच सिमन्स यांनी माघार घेतली होती. त्यामुळे पाच जणांमध्ये चुरस होती.

वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर शास्त्री यांचं पद जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, पुन्हा एकदा प्रशिक्षकपदाची जबाबदारी देऊन बीसीसीआयने त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे. रवी शास्त्री भारतीय संघाचे जून २०१६ पर्यंत संचालक होते. अनिल कुंबळे यांनी २०१७ मध्ये प्रशिक्षकपद सोडल्यानंतर त्यांची नियुक्ती मुख्य प्रशिक्षक म्हणून झाली होती.हेही वाचा -

विराट कोहलीनं एका शतकात मोडले २ विक्रम

मुख्य प्रशिक्षकपदासाठी ६ उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा