Advertisement

विराट कोहलीनं एका शतकात मोडले २ विक्रम

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यानं वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात शतकी खेळी करत सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर यांचा विक्रम मोडला आहे.

विराट कोहलीनं एका शतकात मोडले २ विक्रम
SHARES

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली यानं शतकी खेळी केली. या सामन्यात त्यानं वनडे क्रिकेट कारकीर्दीतील आपले ४२ वे शतक ठोकलं. तसंच, जावेद मियाँदाद, सौरव गांगुलीनंतर आणि सचिन तेंडुलकर या खेळाडुंना मागे टाकलं आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर ३३ 'विनिंग' शतकं होती. मात्र, विराटनं हे शतकी करत सचिनचा हा विक्रम मोडला. त्याशिवाय, वनडे क्रिकेटमधील सर्वाधिक धावा करणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी, सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली हे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर होते. परंतु, विराटनं गांगुलीला मागे टाकत सर्वाधिक वनडे धावांच्या यादीत भारतीयांमध्ये दुसरं स्थान मिळविलं आहे.

४२ शतकं

या सामम्यात विराट कोहलीनं १४ चौकार आणि एका षटकाराचा मारत दमदार शतकी खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने डकवर्थ लुइसनुसार, वेस्ट इंडीजवर ५९ धावांनी दणदणीत विजय मिळवला. विराटनं वनडे कारकिर्दीत एकूण ४२ शतकं केली आहेत. त्यामध्ये ३४ वेळा भारतीय संघाला विजय मिळाला आहे. ३० वर्षीय विराट शतकाच्या प्रतीक्षेत होता. ते शतक अखेर विंडीजमध्ये झळकलं. विराटचं हे ३४ वं विनिंग शतक आहे. तर, सचिनच्या नावावर २३४ सामन्यांत ३३ 'विनिंग' शतकं होती. वनडे क्रिकेटमध्ये सचिनच्या शतकांची बरोबरी करण्यासाठी विराटला आणखी ७ शतके हवी आहेत. सचिनची वनडे क्रिकेटमध्ये ४९ शतकं आहेत.

सर्वाधिक शतकी खेळाडूंची यादी

सर्वाधिक शतकं ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग तिसऱ्या स्थानी आहे. त्यानं २६२ विजयी सामन्यांत २५ वेळा शतक ठोकलं आहे. तर दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम अमलानं १०८ सामन्यांत तब्बल २४ शतके झळकावली आहेत. श्रीलंकेच्या सनथ जयसूर्यानंही २३३ सामन्यांत २४ शतके केली आहेत.

एकूण धावसंख्या ११४०६

दुसऱ्या वनडे सामन्यात केलेल्या १२० धावांमुळं विराट वनडेतील एकूण धावसंख्या ११४०६ झाली आहे. २३८ सामन्यांत त्यानं ही धावसंख्या केली आहे. याआधी सौरव गांगुलीच्या खात्यात ११३६३ धावा होत्या. दरम्यान, सचिन तेंडुलकर हा भारतीय संघामध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याच्या खात्यात १८४२६ धावा आहेत.



हेही वाचा -

गणेशोत्सव २०१९ : 'या' दिवशी होणार तुमच्या लाडक्या बाप्पाचं आगमन

मुख्य प्रशिक्षकपदासाठी ६ उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा