Advertisement

रोहितने मोडला विराटचा विक्रम; टी २० मध्ये बनवल्या सर्वाधिक धावा

भारताकडून टी २० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्यात विराट कोहली पहिल्या स्थानावर होता. त्याने ६२ सामन्यांमध्ये ४८.८८ च्या सरासरीने २ हजार १०२ धावा केल्या आहेत.

रोहितने मोडला विराटचा विक्रम; टी २० मध्ये बनवल्या सर्वाधिक धावा
SHARES
Advertisement

 वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी २० सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने शानदार शतक झळकावण्याबरोबर विराट कोहलीचा एक विक्रमही मोडला अाहे. रोहितने टी २० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज होण्याचा मान मिळवला अाहे. या विक्रमासाठी अावश्यक असणाऱ्या ११ धावा करत त्याने विराटला मागे टाकले. 


२२०३ धावा

भारताकडून टी २० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्यात विराट कोहली पहिल्या स्थानावर होता. त्याने ६२ सामन्यांमध्ये ४८.८८ च्या सरासरीने २ हजार १०२ धावा केल्या आहेत. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात रोहित शर्मा ६१ चेंडूंमध्ये १११ धावा करत टी २० मध्ये सर्वाधिक धावा बनवणारा भारतीय फलंदाज बनला. टी २० मध्ये ८५ सामन्यांमध्ये रोहितच्या एकूण २२०३ धावा झाल्या अाहेत. 


१९६ धावांचं अाव्हान 

मंगळवारी लखनौमध्ये झालेल्या दुसऱ्या टी २० सामन्यात भारताने १९६ धावांचं अाव्हान विंडीसमोर ठेवलं अाहे. टाॅस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय विडिंजने घेतला. भारताकडून कर्णधार रोहित शर्मा अाणि शिखर धवनने जोरदार सुरूवात केली. रोहितने शतक झळकावले. तर शिखरने ४४ धावा केल्या. हेही वाचा -

जहीर मुंबई इंडियनचा बाॅलिंग कोच?

का भडकला गंभीर बीसीसीआयवर?संबंधित विषय
Advertisement