Advertisement

जहीर मुंबई इंडियनचा बाॅलिंग कोच?


जहीर मुंबई इंडियनचा बाॅलिंग कोच?
SHARES

भारतीय क्रिकेट टीमचा माजी तेज गोलंदाज जहीर खान लवकरच मुंबई इंडियन्सचा कोच म्हणून रूजू होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत लसिथ मलिंगा मुंबई इंडियन्सच्या बाॅलिंग मेंटाॅरची जबाबदारी सांभाळत असून ही जबाबदारी जहीर सांभाळू शकतो. जहीर याआधी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडूनही खेळला आहे.


मलिंगाला लिलावात रस

मलिंगाला यावेळेस लिलावात सहभागी होण्याची इच्छा असल्याने तो हे पद सोडेल असं म्हटलं जात आहे. लिलावात मुंबई इंडियन्सने त्याला खरेदी न केल्यास तो इतर टीमकडूनही खेळताना दिसू शकतो. पुढच्या वर्षी आयपीएलचं आयोजन परदेशात होण्याची चिन्हे असल्याने इतर टीमही मलिंगाला आपल्या ताफ्यात घेण्याचा प्रयत्न करतील. यामुळे रिक्त होणाऱ्या जागेवर जहीरची वर्णी लागू शकते.


आयपीएलचा अनुभव

जहीरने याआधी दिल्ली डेअरडेविल्सचं कप्तानपदही भूषवलं असून तो या टीमचा मेंटाॅरही होता. जहीर आतापर्यंत मुंबई इंडियन्स, दिल्ली डेअरडेविल्स आणि आरसीबी या टीम्सकडून खेळला आहे. त्याला आयपीएलचा चांगला अनुभव आहे. जहीरने २०१५ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतली होती.


कोचिंग स्टाफ

सद्यस्थितीत मुंबई इंडियन्स टीमचा कोच महेला जयवर्धने असून सोबत सचिन तेंडुलकर (आयकॉन), रॉबिन सिंग, शेन बाँड, जेम्स पैमेन्ट, पॉल चैपमैन, राहुल संघवी इ. कोचिंग स्टाफमध्ये आहेत.



हेही वाचा-

का भडकला गंभीर बीसीसीआयवर?

आयसीसीच्या 'हाॅल आॅफ फेम'मध्ये राहुल द्रविडचा समावेश



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा